मुंबई

बांधकाम व्यवसायाला जीएसटीमुळे फटका!

मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केंद्र सरकारचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि आर्थिक मंदीमुळे महाराष्ट्रातील रिअल इस्टेट कंबरडे मोडल्याचे गाऱ्हाणे "महाकॉन 2020' अधिवेशनात मांडण्यात आले. जीएसटीमुळे घरांची निर्मिती रोडावली असून, किमतीत मोठी वाढ झाली आहे. या प्रश्‍नी सरकारने वेळीच लक्ष घालून मार्ग काढावा, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी केली. 


विलेपार्ले येथील हॉटेल स्टार सहार येथे "महाकॉन 2020' हे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवारी (ता. 6) सुरू झाले. या अधिवेशनात क्रेडाईच्या (कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) 57 शाखांमधील 700 बांधकाम व्यवसायिक सहभाग झाले आहेत. केंद्र सरकारने लागू केलेला जीएसटी आणि जागतिक आर्थिक मंदीमुळे बांधकाम क्षेत्रावर झालेल्या विपरित परिणामांबाबत या अधिवेशनात चिंता व्यक्त करण्यात आली. 

रिअल इस्टेट व्यवसायात जीएसटी लागू झाल्यामुळे घरांच्या बांधकाम खर्चात चौरस फुटांमागे 250 रुपयांची वाढ झाली. परिणामी घरांच्या किमती 10 टक्‍क्‍यांनी म्हणजे अडीच ते तीन लाख रुपयांनी वाढल्या. त्यामुळे ग्राहक घरखरेदीकडे पाठ फिरवून विमा किंवा सोने खरेदीत गुंतवणूक करण्यास अधिक पसंती देत आहेत. या कारणामुळे बांधकाम व्यावसायिकांचा नफा केवळ 15 टक्‍क्‍यांवर आला आहे, असा दावा करण्यात आला. 

जीएसटी प्रणालीतील जाचक अटींमध्ये बदल करणे आवश्‍यक असल्याची भूमिका अधिवेशनात मांडण्यात आली. वस्तू व सेवा कराचा भरणा केल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांना मिळणारा परतावाही सरकारने मागील 1 एप्रिलपासून बंद केला, याकडे वक्‍त्यांनी लक्ष वेधले. सरकारने नवीन बांधकाम विकास प्रणाली लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. "ना हरकत' दाखला व इतर आवश्‍यक परवानग्या घेण्याची पद्धत वेळखाऊ असल्याने "एक खिडकी' योजना सुरू करण्याची आवश्‍यकताही व्यक्त करण्यात आली. 

स्वस्त घरांच्या निर्मितीला चालना 
मुंबई वगळता इतर परिसरात स्वस्त घरांना मोठी मागणी आहे. त्यामुळे राज्यभरात आर्थिक दुर्बल घटकासाठी स्वस्त घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. रायगड, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये ही घरे बांधली जातील. या घरांच्या किमती 10 ते 15 लाख रुपये असतील, असे सांगण्यात आले. त्यापैकी दीड लाख घरांच्या निर्मितीचे काम सुरू असून, उर्वरित घरांचे बांधकाम लवकरच करण्यात येईल, अशी माहिती क्रेडाईच्या अधिवेशनात देण्यात आली. 


सकल देशांतर्गत उत्पादनात रिअल इस्टेट क्षेत्राचा 25 टक्के वाटा आहे. जीएसटीमधील जाचक अटी आणि क्‍लिष्ट नियमांमुळे बांधकाम व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. केंद्रात आणि राज्यात स्थिर सरकार असल्याने यातून मार्ग काढावा. सरकारने गंभीरपणे पावले उचलल्यास रिअल इस्टेट क्षेत्र या परिस्थितीतून नक्कीच बाहेर येईल. 
- सतीश मगर, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई 

आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या अधिवेशनात बांधकाम व्यावसायिकांना आपले नुकसान भरून काढण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिक लक्ष देण्यास सांगण्यात आले. नव्या सरकारकडे आपल्या अडचणी मांडण्याची संधी असून, सरकारने लक्ष देऊन आमचे प्रश्‍न सोडवावेत, अशी आमची मागणी आहे. 
- राजीव पारीख, अध्यक्ष, क्रेडाई, महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT