#IITBombay : टेकफेस्टला 'आईन्स्टाईन'ची भेट !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

आयआयटीतील टेकफेस्ट महोत्सवाला आज (ता.५) हाँगकाँगच्या बहुचर्चित आईन्स्टाईन रोबोने भेट दिली. हा रोबो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखतो.

मुंबई : आयआयटीतील टेकफेस्ट महोत्सवाला आज (ता.५) हाँगकाँगच्या बहुचर्चित आईन्स्टाईन रोबोने भेट दिली. हा रोबो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखतो.

#JNUAttack : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टचा रविवारी शेवटचा दिवस होता. यामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन रोबो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून या रोबोची भारतातील ही पहिलीच भेट होती. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी हा रोबो भारतात आणण्यात आला. मानवी मनाच्या भावना जाणण्याचे कसब या रोबोमध्ये आहे.

धक्कादायक काय झालंय विचारलं की 'तो' सांगायचा TB आहे, पण त्याला तर होता....

आपल्या मनातील राग, भीती, आनंद, दुःख यांसारखे हावभाव हा रोबो ओळखतो आणि त्यानुसार तात्काळ प्रतिक्रियाही देतो. त्यात चेहरा पाहून वय आणि लिंग सांगण्याचे वैशिष्ट्येही रोबोमध्ये आहे. हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्‍सने ‘फेशिअल रेक्‍गनिशन’ सॉफ्टवेअरचा वापर करून हा रोबो तयार करण्यात आला आहे.

iit bombay Techfest Ernestine robot is main attraction of the event


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: iit bombay Techfest Ernestine robot is main attraction of the event