वज्रेश्‍वरी : गणेशपुरीत सुरू असलेले रस्त्याचे काम.
वज्रेश्‍वरी : गणेशपुरीत सुरू असलेले रस्त्याचे काम.  
मुंबई

गणेशपुरी, वज्रेश्वरीत रस्ते काँक्रीटीकरणात भ्रष्टाचार!

सकाळ वृत्तसेवा

वज्रेश्‍वरी : तीर्थक्षेत्र असलेल्या गणेशपुरी, वज्रेश्‍वरी, अकलोली या गावासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) येथील सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी तब्बल १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित रस्तेकामाचा ठेका शिवसाई कन्स्ट्रक्‍शन कंपनीने घेतला आहे. या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत वारंवार तक्रार करूनही संबंधित एमएमआरडीएचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून मनसेने संबंधितांवर कारवाई करून या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा गणेशपुरी, वज्रेश्‍वरी, अकलोली या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी एमएमआरडीएमार्फत सिमेंट रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. सदरचा ठेका शिवसाई कंपनीला देण्यात आला असला, तरी या रस्त्याच्या देखरेखीसाठी एमएमआरडीएकडून ध्रुव कंपनीचे अधिकारी नेमले आहेत. असे असतानादेखील येथील रस्तेकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून अंदाजपत्राप्रमाणे होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

रस्त्याचे जास्त खोदकाम न करताच सिमेंटचे स्लीपर टाकण्यात येत आहे. तसेच रात्रीच्या वेळेस येथील थोड्या खोदकामावरही डीएलसी हा थर टाकून पाणी न टाकताच तीनचार तासांत पीक्‍यूसी हे आवरण टाकले जात आहे. तसेच या रस्त्यासाठी लागणारी खडी (जीएसबी) हीसुद्धा निकृष्ट असून लाल रंगाची वापरली जात आहे.

मनसेचे विभागप्रमुख सुनील देवरे यांनी रस्तेकामाचे छायाचित्र, तसेच सदर कामाचे चित्रीकरण करून एमएमआरडीए अधिकाऱ्यांना सादर करत अंदाजपत्रकानुसार काम केले जात नसल्याची तक्रार केली आहे. तरीदेखील या ठेकेदारावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याने एमएमआरडीए अधिकारी जाणीवपूर्वक दूर्लक्ष करीत असल्याचा आरोप देवरे यांनी केला आहे. याविरोधात येत्या काही दिवसांत एमआरडीएच्या मुंबई येथील कार्यालयाजवळ उपोषणास बसण्याचा लेखी इशारा देवरे यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी एमएमआरडीएचे विभागीय कार्यकारी अभियंता भगवान चव्हाण यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

सदर रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार सुरू आहे; तर काही ठिकाणी रस्त्यावर उंची व रुंदीसाठी बदल करावे लागत आहेत. रस्तेकामात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नसून वेळोवेळी एमएमआरडीए अभियंत्यांकडून तपासणी केली जात आहे. सदर काम निकृष्ट आहे की नाही, हे संबंधित विभागाचे अधिकारी तपासणी केल्यावर ठरवतील.
- श्री संखे, शिवसाई कन्स्ट्रक्‍शन
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT