मुंबई

मुंबईत रुग्णवाढीची गती मंदावली; गेल्या 24 तासात 925 रुग्णांची भर; तर इतक्या रुग्णांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत बाधित रुग्णांचा आकडा हजाराच्या खाली आला असून आज 925 बाधित रुग्णांची भर पडली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1,24,322 झाली आहे. तर आज 46 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 6,842 वर पोचला आहे. मुंबईत आज 1407 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 78 टक्के इतका आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या 46 मृत्यूंपैकी 39 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 26 पुरुष तर 20 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 46 मृतांपैकी चौघांचे वय 40 वर्षा खालील होते. 30 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 12 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                   

कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 1407 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 97,993 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 86 दिवसांवर गेला आहे. तर 9 ऑगस्ट पर्यंत एकूण 6,05,419  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  3 ऑगस्ट  ते 9 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.80 इतका आहे. 

मुंबईत 587 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,489 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 5,258 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 4,040 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

----------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईचा विकास रखडला? बीएमसी बजेटपैकी ४८% निधी अजूनही प्रलंबित, खर्चाचे आकडे समोर

Viral Video: धक्कादायक! आईनं १०व्या मजल्याच्या बाल्कनीतून मुलाला लटकवलं; वेगळंच कारण समोर, पाहा व्हायरल व्हिडिओ

Mumbai: रस्ते आणि पुलांना नवी ओळख मिळणार! मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलणार; पण कोणत्या? जाणून घ्या यादी...

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

Dhule News : दोंडाईचा पोलिसांची मोठी कामगिरी! वर्णेश्वर महादेव मंदिरातील चोरीचा २४ तासांत छडा

SCROLL FOR NEXT