Mumbai
Mumbai sakal
मुंबई

मुंबईतील ५०० उद्यानांचा डेटाबेस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानपालिका आणि मिनिस्‍ट्री ऑफ मुंबईज मॅजिक या संस्थेतर्फे मुंबईतील उद्यानांचे मूल्यांकन करून याचा अहवाल नुकताच पालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. यामध्ये ५०० उद्यानांपैकी पालिकेच्या केवळ १८ टक्के उद्यानांना अ श्रेणी प्राप्त झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये अव्‍वल उद्यानांना अ श्रेणी देण्‍यात आली आहे. मूल्‍यांकन केलेल्‍या ५०० उद्यानांपैकी १८ टक्‍के उद्यानांना ‘अ’ श्रेणी, तर ७० टक्‍के उद्यानांना ‘ब’ श्रेणी (उत्तम स्थिती) आणि १२ टक्‍के उद्यानांना ‘क’ श्रेणी (सुधारणा करण्‍याची गरज) देण्‍यात आली आहे.

सर्वेक्षणातून उद्यानांच्या स्थितीबाबत नागरिकांचा प्रतिसाद, मतेही जाणून घेण्यात आली आहेत. त्यानुसार, उद्यानांमधील प्रकाशयोजना चांगल्या प्रतीची असून उद्यानांची देखरेखही उत्तमरित्‍या केली जात असल्याचे नमूद करण्यात आले. तर नागरिकांनी केलेल्या शिफारसींमध्ये उद्यानामध्ये विकलांग व्यक्तींसाठी सुविधा असाव्यात, उद्यानांमध्‍ये किंवा उद्यानांच्‍या आसपासच्‍या परिसरामध्‍ये सार्वजनिक शौचालये असावीत, पिण्‍याच्‍या पाण्‍याची सुविधा असावी आदींचा समावेश आहे.

मुंबईतील उद्यानांचे संशोधन ‘हरिता दी ग्रीन फूटप्रिंट फेलोशिप’चा भाग आहे. याद्वारे सार्वजनिक उपक्रमांच्या कृतीला चालना देणे आणि मुंबईतील सर्वोत्तम हरित ठिकाणांचा शोध घेऊन हा अहवाल बनविण्यात आला आहे.

या सर्वेक्षणातून ५०० मध्ये मुंबईच्‍या हरित जागांच्‍या एकूण स्थितीबाबत सुस्‍पष्‍ट व सुलभ माहिती उपलब्ध झाली आहे. मूल्यांकनात मुंबईतील प्रत्‍येक उद्यानाला श्रेणींसोबत युनिक कोड्स देण्‍यात आले आहेत.

हरित शहरासाठी महत्त्वाचे पाऊल

तीन महिन्‍यांच्‍या शिष्यवृत्ती कालावधीदरम्‍यान वास्तूकला, शहरी नियोजन, आराखडा, सामाजिक कार्य व पर्यावरण रचना अशा विविध पार्श्‍वभूमींमधील तरुणांनी शहराच्या पोषक वाढीसाठी पुढाकार घेतला. या तरुणांचे कार्य हरित व राहण्‍यास अनुकूल शहर निर्माण करण्‍यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी व्‍याप‍क प्रशिक्षण उपक्रमाच्‍या माध्‍यमातून तरुणांना डेटाबेस निर्माण करण्‍याचे शिक्षण देण्‍यात आले आणि डेटा गोळा करण्‍यासोबत मॅपिंग करण्‍याच्‍या प्रक्रियेची माहिती देखील देण्‍यात आली.

"उद्याने व मनोरंजनपूरक मैदांनाच्‍या या व्‍यापक सर्वेक्षण आणि श्रेणीचा आम्हाला फायदा होईल. प्रकल्प अहवाल उद्याने व मैदानांचा विकास करण्‍याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून पुढील देखभाल व व्‍यवस्‍थापनाच्या नियोजनासाठी तो फायद्याचा ठरेल."

-जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, मुंबई पालिका

"मुंबईच्‍या हरित ठिकाणांना मिळणाऱ्या पसंतीमुळेच हा प्रचंड डेटाबेस तयार झाला आहे. हा तांत्रिक अहवाल मुंबईच्‍या हरित जागांमध्‍ये नवीन उद्यानांचे''अपग्रेडेशन प्लॅन'' तयार करण्‍यासाठी उद्यान विभागाला उपयोगी ठरणार आहे."

- रूपाली वैद्य, प्रकल्प प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT