MLA Raju Patil
MLA Raju Patil Sakal
मुंबई

Dombivali News : भाजपची ती सवयच; आमदार राजू पाटलांचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सल्ला

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी होईल असे संकेत आमदार गणपत गायकवाड यांनी दिले आहेत. आमदारांचे हे वक्तव्य म्हणजे मनोरंजन असे उत्तर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे दिले आहे. यावर पुन्हा आमदार गायकवाड यांनी ट्विट करत प्रतिउत्तर देऊ केले आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून सुरू असलेले हे रणकंदनात मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपची ती सवयच असे म्हणत खासदारांनी आमदारांशी आपले वर्तन सुधारावे असा सल्ला देऊ केला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघावरून पुन्हा एकदा सत्तेतील भाजप व शिंदे गटात चढाओढ दिसून येऊ लागली आहे. भाजपमधील वरिष्ठांनी शिवसेनेच्या जागा त्यांनाच जातील असे म्हणत शिंदे गटाला शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी स्थानिक पातळीवरील आमदार मात्र हा संघ शिवसेनेला सोडण्यास तयार नसल्याचे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घडामोडींवरून दिसून येत आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे शिंदे गटास विकासकामावरून सातत्याने बोलताना दिसुन येत आहेत.

देशातील तीन राज्यांच्या निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला असून यावरूनच आमदार गायकवाड यांनी भिवंडी व कल्याण लोकसभेची जागा देखील भाजपचा उमेदवार जिंकेल असे विधान केले. यावरून खासदार डॉ. शिंदे यांनी त्यांचे वक्तव्य हे मनोरंजन असे म्हणत त्यांना डिवचले.

यानंतर आमदार गायकवाड यांनी 'ज्यांना गद्दारी करून कमी वेळात आमाप पैसा आणि सत्तेच बळ मिळाले आहे. त्यांना त्यांच्या नजरेने सर्व जग विदूषक आहे असा भास होतो! " असे खरमरीत ट्विट करत शिंदे गटाला ललकारले आहे.

लोकसभेसाठी मनसेचे ही नाव चर्चेत आहे. असे असताना यामध्ये आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील आपले मत मांडले आहे. भाजप आमदार गायकवाड यांनी बाजू घेत पाटलांनी शिंदे यांना सल्ला देऊ केला आहे.

आमदार राजू पाटील म्हणाले, याच्यामागे दोन गोष्टी आहेत. नुकतेच तीन राज्याचे निकाल लागले आहेत. त्यात भाजपाला भरघोस यश मिळालेले आहे. भाजपाची सवय आहे ते चांगल्या परिस्थितीत असतील तर ते छोट्या पक्षांना दाबायचा प्रयत्न करतात. आणि ते इथे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने ते बोलले असतील.

तसेच दुसरी बाजू इथले जे खासदार आहे ते इतर पक्षीय आमदारांशी कशा पद्धतीने वागतात. त्यामुळे त्यांनी तशी भावना बोलून दाखवली त्यामुळे ती योग्य आहे असे वाटते. या लोकांनी आपल्याला ज्या भावनेने निवडून दिले आहे. हे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघात सहा आमदार आहेत.

त्याच्याशी चांगलं वागून त्यांच्या काही सूचनांचा अभ्यास केला तर त्यांना भविष्यात ते चांगले पडू शकते. हा माझा सल्ला आहे त्यांना. परंतु ते असे कधी वागताना दिसले नाही त्यामुळे दुर्दैवाने असे बोलावे लागते असे आमदार पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT