Shambhuraj Desai
Shambhuraj Desai sakal
मुंबई

Dombivali News : पालकमंत्री म्हणून मी बैठका घेईल - शंभूराजे देसाई

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ठाणे, नवी मुंबई येथून कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शिळफाटा मार्गावर बुधवारी रात्री मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीवरून कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या सूचना ऐकण्यासाठी वेळ द्यावा, हवं तर श्रेय तुमच्या पुत्राला द्या असे म्हणत ट्विटच्या माध्यमातून खरपूस टिका केली होती.

याला उत्तर देताना त्याचं काय म्हणणं असेल ते त्यांनीं पालकमंत्री म्हणून माझ्याकडे द्यावं. कल्याण शिळ रोड बाबत काही सुधारणा करायच्या असतील तर पालकमंत्री म्हणून मी बैठका घेईल असे म्हटले आहे. यामुळे आता कल्याण शीळ वाहतूक कोंडीला कोणते राजकीय वळण मिळते हे पहावे लागेल.

कल्याण शीळ रोडवर बुधवारी मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी झाली होती. कल्याण फाटा येथील वाहतुकीत बदल करण्यात आल्याने ही कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. अवघ्या 15 मिनिटाच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण ते एक तास लागत होता. त्यामुळे रात्री कामावरून घरी परतणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले आहेत.

याबाबत नागरिकांनी सांगितले की कल्याण - शिळ रोडवर अवजडं वाहनांना बंदी घालवी, तसेच रखडलेल्या पलवा पुलाचे काम लवकरात लवकर करावे. दरम्यान याचं विषयावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर एक्स (ट्विटर) माध्यमातून टीका केली.

या विषयावरूनच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आपली प्रतिक्रिया देत सांगितले की ते आजपर्यंत या विषयावर मला बोलेले नाहीत किंवा भेटलेले नाहीत, त्याचं काय म्हणणं असेल ते त्यांनीं पालकमंत्री म्हणून माझ्याकडे द्यावं. कल्याण शिळ रोड बाबत काही सुधारणा करायच्या असतील तर पालकमंत्री म्हणून मी बैठका घेईल...

काय म्हणाले मनसेचे आमदार...

शीळफाट्याच्या वाहतुककोंडीने स्वतःचेच विक्रम मोडले. मुख्यमंत्री साहेब आपले पुत्र पण येथील लोकप्रतिनिधी आहेत, वाहतुककोंडी सुटावी यासाठी रोज नव्यानव्या ‘स्किम’ घेऊन येतात, त्या स्किम नसतातच, पॅाकेटमनीसाठी केलेला ‘स्कॅम’ असतो अश्या चर्चा ठेकेदार वर्गात सुरू आहेत. गरोदर बायका, वृध्द, रूग्ण सगळे तासनतास ट्रॅफिकला सामोरे जातायत तेही आपल्या सुपुत्राच्या मतदारसंघात?

महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या? कधीतरी आमच्या सुचनांचा विचार करा, कदाचीत वाहतुक कोंडी कमी होईल! पाहिजे तर श्रेय तुमच्याच पुत्राला घेऊ द्या पण एकदा आमच्या सुचना ऐकण्यासाठी वेळ द्या व शिळफाट्याच्या ट्रॅफिक जामचा शिक्का तेवढा पुसा.

काय सांगितले पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी....

मी या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहे. ते आजपर्यंत या विषयावर मला बोलेले नाहीत किंवा भेटलेले नाहीत, त्याचं काय म्हणणं असेल ते त्यांनीं पालकमंत्री म्हणून माझ्याकडे द्यावं. परंतु कल्याण शीळ रोडवरच्या ट्राफिक जामच्या संदर्भामध्ये पाठीमागच्या वेळी देखील गणेशोत्सवादरम्यान मी दोन बैठका घेतल्या होत्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील योग्य त्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांना देखील योग्य त्या सूचना दिल्या होत्या.अजूनही यात काही सुधारणा करायच्या असतील तर पालकमंत्री म्हणून मी बैठका घेईल...

अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं असे वक्तव्य संजय राऊत यांनी सकाळी केले होते, याच वक्तव्यावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी डोंबिवलीत प्रतिक्रिया दिली आहे...

काय म्हणाले शंभूराजे देसाई....

मुख्यमंत्री पद घेण्यासाठी १४५ आमदारांच बहुमत लागत, हे माननीय अजित दादांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे.आज राज्यामध्ये महायुतीच सरकार आहे. शिवसेना, भाजप आणि अजित दादाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष आणि यामध्ये स्पष्ट ठरलेलं आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील २०२४ ला निवडणुकीचा निकाल लागेल त्यात नक्कीच २०० पेक्षा अधिकच बहुमत महायुतीला महाराष्ट्रात मिळवेल.ते बहुमत मिळवल्या नंतर, चर्चा करून बैठक करून पुढील निर्णय घेतला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT