file photo 
मुंबई

संशयित करोना रुग्णांची दोन वेळा तपासणी 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : करोना विषाणूसंसर्गाच्या संशयित रुग्णांच्या रक्ताची दोन वेळा तपासणी करण्याचा निर्णय सोमवारी (ता. 27) राज्याच्या साथ नियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पहिल्या तपासणीचा अहवाल नकारात्मक आल्यावर चार दिवसांनी पुन्हा तपासणी करण्यात येईल. तोपर्यंत रुग्णाला विशेष कक्षात तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येण्यात येणार आहे. त्याचबरोबर 1 जानेवारीपूर्वी चीनमधून मुंबईत आलेल्या प्रवाशांची माहिती घेतली जाणार आहे.


फोर्ट येथील जी. टी. रुग्णालयात सोमवारी राज्याच्या साथ नियंत्रण समितीची बैठक झाली. सध्या मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात चार संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील तीन रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची एकदा तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या रक्ताची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. या वेळीही अहवाल "निगेटिव्ह' आल्यास त्यांना घरी जाण्याची परवानगी व विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात येईल. पहिल्या रक्ततपासणीचा अहवाल "निगेटिव्ह' आल्यास त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येईल. 


या बैठकीला समितीचे अध्यक्ष सुभाष साळुंके, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आणि माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आदी उपस्थित होते. करोना संसर्गाच्या रुग्णांसाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यातील नायडू रुग्णालय येथे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. 


राज्य सरकारने 18 जानेवारीपासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत 2600 प्रवाशांची तापसणी करण्यात आली. आता 1 जानेवारीपूर्वी चीनमधून आलेल्या प्रवाशांची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून घेतली जाणार आहे. वुहान प्रांतातून आलेल्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या प्रवाशांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांतही करोनासदृश आजाराची लक्षणे दिसतात का, याची चौकशी करण्यात येणार आहे. 

खासगी रुग्णालयांसाठी निकष 
सध्या सार्वजनिक रुग्णालयांमध्येच विशेष कक्ष तयार करण्यात आले आहेत. भविष्यात गरज वाटल्यास खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाईल. त्यासाठी निकष ठरवण्यात येणार असल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. खासगी डॉक्‍टरांना करोना संसर्गाबाबत मार्गदर्शक सूचनाही देण्यात येणार आहेत. 

शंकानिरसनासाठी कॉल सेंटर 
करोना संसर्गासंदर्भात शंकांचे निरसन करण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांना 104 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT