मुंबई

‘गोगो’च्या झुरक्यात तरुणाई बेधुंद!

किशोर कोकणे

ठाणे - गांजा, चरस, अफीम सेवनासाठी आता नशेबाज तरुणांना ‘गोगो’ पेपर अर्थात ‘प्री रोल’ पेपरची भुरळ पडली आहे. या पेपरमध्ये तंबाखू किंवा अमली पदार्थ भरून नशा करणारे तरुण सध्या शहरातील उपवन, येऊर, घोडबंदरसह काही रेल्वेस्थानक परिसरात दिसतात. मुंबई, ठाणे शहरातील रस्त्यालगतच्या पानटपऱ्यांवर गोगो किंवा रॉ या नावाने प्री रोल पेपर विकला जातो. चिलमला पर्याय म्हणून याचा वापर वाढला आहे.

नशेचा बाजार मांडणाऱ्यांकडून नशेला अधिक नफेखोर बनवण्यासाठी नव्या शक्कल लढवल्या जातात. अशीच शक्कल लढवून तयार केला जाणारा गोगो पेपर अवघ्या आठ ते १० रुपयांत टपऱ्यांवर मिळत आहे. रेल्वेस्थानक परिसरासह गल्लीबोळातील टपऱ्यांवर तो मिळतो. अशा पदार्थांच्या विक्रीमुळेच रेल्वेस्थानक परिसरातील टपऱ्यांना महिन्याला ४० हजारांचे भाडे देणे परवडत असल्याचे समजते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अल्पवयीन मुलेही हा पेपर खरेदी करत असल्याचे टपरीचालक खासगीत सांगतात, तर काही टपरीचालक या पेपरमध्ये काही आक्षेपार्ह नसल्याचाही दावा करतात.

उत्तरेकडून गांजाचा प्रवास
राज्यात अमली पदार्थांवर कारवाई होत असली, तरी उत्तर प्रदेशातून गांजा, चरस, अफू आदी मुंबई, ठाण्यात सहज पोहचतात. ग्रामीण भागात गांजाला सर्वाधिक मागणी आहे. तो चिलममध्ये भरून ओढला जातो. मात्र, चिलम तरुणांना सहज मिळत नाही. त्यामुळे गांजा, चरस ओढण्यासाठी प्री रोल पेपर वापरण्याची नवी शक्कल नशेबाजांनी शोधून काढली आहे.  ‘प्री रोल’ पेपर सिगारेटसारखा असून या रिकाम्या पेपरच्या आत गांजा, चरस, अफिम, भांग यांसारखे अमली पदार्थ भरले जातात. त्यानंतर या पेपरचे पुढील टोक बंद करून नशा केली जाते.


वरिष्ठांच्या आदेशानुसार अमली पदार्थाप्रकरणी कारवाई सुरू आहे. प्री रोलसारखा कोणताही पेपर विक्री केला जात असेल, तर कारवाई करण्यात येईल. 
- किशोर खैरनार,  वरिष्ठ निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक, ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT