अलिबाग : शेणाची खळी बनवताना कामगार.
अलिबाग : शेणाची खळी बनवताना कामगार. 
मुंबई

पारंपरिक शेणाची खळी कालबाह्य होण्‍याच्‍या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग (बातमीदार) : वाढते मुरूम मातीचे दर, खळी बनवण्यासाठी येणारा वाढता खर्च, शेणाचा तुटवडा अशा अनेक कारणांमुळे मासळी सुकवण्यासाठी पारंपरिकरीत्या बनवण्यात येणारी शेणाची खळी आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. तुलनेत खर्च कमी येत असल्याने अनेकांनी गेली काही वर्षे सिमेंटपासून कायमस्वरूपी खळी बनवण्याकडे भर दिला आहे. यामुळे काहींना रोजगार मिळत होता; मात्र सध्या हा रोजगार बुडाल्यात जमा आहे.

पावसाळा संपल्यावर साधारण दिवाळीनंतर मच्छीमार मासळी सुकवण्यासाठी खळी बनवतात. ओली मासळी सुकवण्यासाठी मच्छीमार शेणापासून सारवून खळी तयार करतात. त्यासाठी खेडोपाड्यांतून कामगारांना बोलवावे लागत होते. जागा बघून खळी तयार करण्याचे दर ठरवत असत. त्यानुसार खळी बनविण्याचे काम होत होते. 

सध्याची परिस्थिती पाहता या खळ्यांचा खर्च परवडण्यासारखा नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून पर्याय म्हणून सिमेंटची खळी बनविण्याचे काम मच्छीमारांनी सुरू केले आहे. जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, रेवदंडा, नागाव, नवगाव, थळ, रेवस, श्रीवर्धन अशा अनेक समुद्रकिनारी बंदरावर; तसेच कोळी समाजाच्या वसाहतीजवळ सिमेंटची खळी बनवण्याचे काम वाढू लागले आहे. खळी बनवण्याचा खर्च एकदाच होत असल्याने मच्छीमारांना ती परवडण्यासारखी होऊ लागली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सिमेंटच्या खळ्यांना अधिक पसंती दिली जात आहे. सिमेंटच्या खळ्यांच्या वापरामुळे शेणापासून सारवून बनवली जाणारी खळी कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत.

खर्चिक खळी न परवडणारी
शेणापासून बनवले जाणारे खळे बनवणाऱ्या कामगारांसाठी १५ हजार रुपयांपासून ते २० हजार रुपयांपर्यंतचा मोबदला मोजावा लागतो. तसेच त्यासाठी मुरूम माती, शेणही हेही बाहेरून पैसे खर्च करून आणावे लागते. ही प्रक्रिया खूपच खर्चिक असते. सर्व एकत्रित खर्च पाहता तो ३० हजारांहून अधिक होतो. त्यात वर्षातून सहा वेळा या खळ्यांची डागडुजी करावी लागत असे. त्यामुळे हा खर्च सध्या मच्छीमारांना परवडेनासा झाला आहे.

पावसाळा संपल्यावर ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये मासळी सुकविण्यासाठी खळी बनविण्याचे काम केले जाते. शेणाची खळी बनविण्यासाठी खूप वेळ जात असे; परंतु सिमेंटच्या खळ्यांमुळे वेळ वाचू लागला आहे.
- प्रशांत तबीब, मच्छीमार, अलिबाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

SCROLL FOR NEXT