मुंबई

ED News: मुंबई, दिल्ली, गोव्यासह ९ ठिकाणी ईडीची छापेमारी

सकाळ वृत्तसेवा

ED News: अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने आज खासगी कंपनीवरील मनी लाँडरिंगच्या आरोपात दिल्ली, मुंबई आणि गोव्यातील नऊ ठिकाणी छापेमारी केली आहे. कारवाईदरम्यान ईडीने ८० लाख रुपयांची रोकड जप्त केली. डार्विन ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक अजय सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरांची झडती घेण्यात आली.(maharashtra ed news)

या कारवाईत ७८ लाख भारतीय रुपये आणि दोन लाख रुपये किमतीचे विदेशी चलन जप्त करण्यात आले. तसेच छापेमारीदरम्यान ईडीने डिजिटल उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भात मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी तपास करत आहे.(ed raid news)

२०२०मध्ये वेस्टिज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बँक खात्यातून डलेमन रिया-आयटी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यात १८ कोटी रुपये फसवणुकीने हस्तांतरित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा व्यवहार फसवा असून कंपनीच्या नावे तोतया प्रतिनिधी मोहम्मद शमशुद्दीन यांनी व्यवहार केल्याचे तपासात उघड झाले आहे.(fraud with money ed)

वेस्टिज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडकडून डेलेमन रिया-आयटी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एकूण १८ कोटी रुपये फसव्या मार्गाने हस्तांतरित केले गेले. ईडीच्या माहितीनुसार, डार्विन ग्रुप ऑफ कंपनीज आणि त्यांचे संचालक अजय हरिनाथ सिंग यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रक्कम हस्तांतरित करण्यात आली. हरिनाथ सिंग यांना प्रत्यक्षात या व्यवहाराचा फायदा झाल्याचे आढळले.(Harinath Singh actually found himself benefiting from this transaction)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar Constituency Lok Sabha Election Result: ना जलील ना खैरे ऑन्ली भूमरे, वादांच्या भोवऱ्यात अडकूनही शिंदे गटाने मिळवला मोठा विजय

Satara Lok Sabha Result: तुतारीसारख्या दिसणाऱ्या चिन्हाने शशिकांत शिंदेचा केला घात...साताऱ्यात नेमकं काय घडलं?

Social Media Reaction: निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजार कोसळला; सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस

India Lok Sabha Election Results Live : गुजरातच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने पाडले भगदाड! भाजपच्या क्लीनस्वीपच्या स्वप्नाला कोणी फेरले पाणी? 

Maharashtra Lok Sabha Election Results Live : बीडमध्ये पंकजा मुंडे विजयाच्या दिशेने, तब्बल ७५ हजार मतांचं लीड

SCROLL FOR NEXT