मुंबई

Loksabha 2019 : शिक्षकांना पुन्हा निवडणुकीची कामे 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी नियामक व परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना सहमुख्य निवडणूक अधिकारी यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांना केली होती. यानंतरही परीक्षकांना निवडणुकीची कामे देण्यात आली असून, यामुळे पेपर तपासणीच्या कामावर परिणाम होणार आहे. यामुळे दोन्ही परीक्षांचे निकाल लांबणीवर जाण्याची शक्‍यता शिक्षक व्यक्त करत आहेत. 

निवडणूक आयोगाने दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणाऱ्या शिक्षक आणि नियामकांना निवडणुकीच्या कामावर नियुक्त केले. यानंतर त्यांनी नियमनाचे काम करावे की निवडणुकीचे, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. यानंतर विविध शिक्षक संघटनांनी या प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली. यानंतर निवडणूक आयोगाचे उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढून दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम करणाऱ्या शिक्षकांना कामातून सूट देण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतरही जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी शिक्षकांना निवडणुकीचे काम दिले आहे. यामुळे पेपर तपासणीचे काम करणाऱ्या शिक्षकांची अडचण निर्माण झाली आहे. पेपर वेळेत तपासले न गेल्यास निकाल लांबण्याची शक्‍यता शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT