admission 
मुंबई

"कलम 370'चा अभियांत्रिकी प्रवेशाला फटका ? 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 21 : जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा "कलम 370' रद्द केल्यानंतर राज्य सरकारने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत जम्मू-काश्‍मीरच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या कोट्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्याचा फटका यंदाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सरकारने वेळीच याबाबत निर्णय न घेतल्यास प्रवेश खोळंबण्याची भीतीही अधिकारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे सीईटी सेलने उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पत्र लिहिले आहे. 

केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा असलेले "कलम 370' रद्द केल्यानंतर देशात त्याबाबत समर्थन आणि विरोधही होत आहे. मात्र, त्याचा फटका आता राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत जम्मू-काश्‍मीरच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सर्व संस्थांमध्ये प्रत्येक शाखेच्या एकूण जागांमध्ये एक जागा राखीव आहे. या कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी जम्मू-काश्‍मीरमधील हजारो विद्यार्थी अर्ज करतात; परंतु यंदा "कलम 370' रद्द झाल्याने हा कोटा रद्द करावा लागणार आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून त्यासंदर्भात मार्गदर्शन सीईटी सेलला मिळालेले नाही. त्यामुळे "नीट' आणि "एमएचटी-सीईटी' प्रवेश परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. 

प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपलब्ध असणाऱ्या जागांची माहिती उपलब्ध करून द्यावी लागते. त्यामुळे जम्मू-काश्‍मीरमधील विद्यार्थ्यांसाठी असलेला कोटा कायम ठेवायचा की इतर राज्यांच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 15 टक्के कोट्यातून प्रवेश द्यायचा, या द्विधा मनस्थितीत सीईटी सेलचे अधिकारी आहेत. याबाबतचा तिढा वेळीच न सुटल्यास प्रवेश प्रक्रिया खोळंबण्याची स्थिती ओढवण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

जम्मू-काश्‍मीरमधील विद्यार्थ्यांच्या कोट्याबाबत आम्ही उच्च-तंत्रशिक्षण विभागाला पत्र लिहिले आहे. विभागाकडून याबाबत माहिती मिळताच त्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. 
- संदीप कदम, आयुक्त, सीईटी सेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US Tension: अमेरिकेचा दबाव, पण भारत ठाम! होर्मुज मिशनसाठी सैन्य पाठवण्यास नकार; नरेंद्र मोदी G7 बैठकीत मांडणार मत

५०० रुपयांची लाच आणि थेट एसीबीच्या जाळ्यात! भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्या RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक प्रताप

Mumbai News: खाकी जाणार, सफारी येणार; ठाणे पालिकेतील शिपायांचा गणवेश रुबाबदार होणार

Surat Police Viral Video : पोलीस कर्मचारी ठरला देवदूत ! जीव धोक्यात घालून सातव्या मजल्यावर चढला अन् तरुणाचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

Jalna Crime: शिक्षकच ठरला भक्षक! विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून अत्याचार; जालन्यात शिक्षक अटकेत, शिक्षणाच्या मंदिरातच घडला संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT