esakal | CAA वरून आंदोलकांना भडकावण्याचं काम कोण करतंय? उद्धव ठाकरे म्हणतात... 
sakal

बोलून बातमी शोधा

CAA वरून आंदोलकांना भडकावण्याचं काम कोण करतंय? उद्धव ठाकरे म्हणतात... 

CAA वरून आंदोलकांना भडकावण्याचं काम कोण करतंय? उद्धव ठाकरे म्हणतात... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली ही पहिलीच औपचारिक भेट भेट आहे. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात CAA, NRC, NPR आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. याचसोबत GST परतावा, पीकविमा आणि महाराष्ट्राच्या अनेक विकासकामांबद्दल देखील चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.    

मोठी बातमी - म्हणाली बाजारातून कपडे खरेदी करून येते आणि सासऱ्यांच्या शेतातील झोपडीत... 

केंद्राचं सहकार्य महाराष्ट्राला मिळावं यासाठी मोदींची भेट घेतल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. नरेंद्र मोदी यांनी मला आश्वासन आणि वचन दिलं आहे. राज्यासाठी जे जे चांगलं असेल ते ते देऊ असं मोदींनी म्हंटल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. जनगणना दर दहा वर्षांनी येते, अशात NPR ला घाबरण्याची काम नाही. याबद्दलची कलमं समोर आल्यावर त्याबाबत सविस्तर चर्चा होऊ शकते, असं देखील उद्धव ठाकरे म्हणालेत. महाराष्ट्रातील जनतेला NPR ला घाबरायचं कारण नाही आणि मी महाराष्ट्राच्या जनतेला याबाबत आश्वस्त देखील केलंय असे देखील मुख्यमंत्री म्हणालेत.  

VIDEO : आरारा... वरातीतच नवऱ्याची फाटली पॅन्ट आणि...

CAA वरून आंदोलकांना भडकावण्याचं काम कोण करतंय?

  • पत्रकार : "CAA मुळे कुणाचं नागरिकत्त्व जाणार नाही, असं तुम्ही म्हणत असाल तर देशात सुरु असलेली आंदोलनं थांबवण्यासाठी तुम्ही लोकांना सांगणार का ?
  • उद्धव ठाकरे : "ज्यांनी हे आंदोलन भडकवले आहे त्यांनी हे समजून आंदोलन थांबवायला हवं. आपण एखाद्या आंदोलनाला समर्थन करत असू तर का करतोय? आणि करत नसू तर का नाही? हे त्या-त्या नेत्यांना समजायला हवं"
  • पत्रकार : "या आंदोलकांना भडकावण्याचं काम कोण करतंय?" 
  • उद्धव ठाकरे : "तुम्ही दिल्लीत राहतात तुम्हालाच ठाऊक..."

who is triggering minds of CAA agitators cm uddhav thackeray says you know it better