मुंबई

वडिलांसह लहान मुलींच्या एकत्रित आत्महत्येने मुंबई हादरली, कांदिवलीत खळबळ!

सुमित बागुल

मुंबई : उत्तर मुंबईतील कांदिवलीमधील चारकोप भागातील गांधीनगर भागामध्ये राहणाऱ्या एकाच घरातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कांदिवलीतील एकाच घरातील वडील आणि दोन मुलींनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. या आत्महत्येनंतर   चारकोपमधील गांधीनगर परिसरात खळबळ माजली आहे.

सदर घटनेनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावर पाच रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत.  पोलिसांकडून सध्या घटनास्थळावर पंचनामा सुरु आहे. दरम्यान, ही नक्की आत्महत्या आहे की आणखीन काही याबाबत देखील पोलिस अधिक तपास करत आहेत. 

या खळबळजनक घटनेत एक पंचेचाळीस वर्षीय व्यक्ती आणि त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. टीव्ही माध्यमानुसार समोर आलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचं वय ४५ वर्षे तर दोन मुलींचं वय १२ आणि ९ वर्षे असल्याचं समजतंय. आज संध्याकाळी साडे सहा वाजता सदर घटना घडली आहे. या तिघांनी गळफास घेत आत्महत्या का केली, याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.   


man and her two daughter committes suicide in kandivali charkop gandhinagar area

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT