दुसऱ्या अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर संजय राऊत ICU मध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर संजय राऊत ICU मध्ये

शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांची आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात 'अँजिओप्लास्टी सर्जरी' पार पडली.

दुसऱ्या अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर संजय राऊत ICU मध्ये

मुंबई : शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांची आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात 'अँजिओप्लास्टी सर्जरी' पार पडली. कालच संजय राऊत मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर आज त्यांच्यावर 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया पार पडली. संजय राऊत यांच्यावर पार पडलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं रुग्णालयाकडून कळवण्यात आलं आहे. त्यानंतर सध्या संजय राऊत यांना इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजेच (ICU) मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. 

महत्त्वाची बातमी : प्रत्येक आठवड्याला 30 लाखांची ड्रग्स विक्री, मोठा कालाचिठ्ठा झाला उघड 

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र आता त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्यानं डॉक्टरांनी परत अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला दिला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल 2020 ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. 

मुंबईतील सर्व महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर । Marathi news from Mumbai

मुंबईतील लिलावती रूग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ मॅथ्यू यांनी राऊत यांच्यावर आज शस्त्रक्रिया केली. डॉक्टर मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. संजय राऊत यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

angioplasty surgery successful on sanjay raut he is in ICU and under doctors observation

loading image
go to top