Dahisar Fire Brigade Recruitment
Dahisar Fire Brigade Recruitment Sakal
मुंबई

Video : दहिसरमधील महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान पोलीस-उमेदवारांमध्ये झटापट

सकाळ डिजिटल टीम

Dahisar Fire Brigade Recruitment : दहिसरमध्ये महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान मोठा गोंधळ झाला आहे.

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

भरतीसाठी आलेल्या उमेदवारांपैकी जास्त उंचीच्या मुलींना बाहेर काढल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

दहिसरमध्ये महिला आणि पुरुष या दोन्ही गटासाठी भरती प्रक्रिया सुरू असून, राज्याच्या विविध जिल्ह्यातून जवळपास दोन ते तीन हजार मुली दहीसरमध्ये दाखल झाल्या आहेत.

परंतु, आहे. मात्र, महिलांची उंची ही 162 सेंटीमीटर हवी, असा निकष होता. मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी 163 किंवा 164 सेंटीमीटर ऊंची असलेल्या उमेदवारांनादेखील बाहेर काढण्यात आल्याचा आरोप महिला उमेदवारांनी केला. यामुळे महिला उमेदवारांमध्ये संताप निर्माण झाला.

त्यानंतर उपस्थित महिला उमेदवारांनी निवडप्रकियेच्या ठिकाणीच आंदोलन सुरू केले. यामुळे येथे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस आणि उमेदवारांमध्ये काहीशी झटापट झाली.

दरम्यान, या सर्व घटनेवर मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उंचीच्या निकषानुसार पात्र ठरलेल्या ३३१८ महिला उमेदवारांची पुढील निवड प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.

आंदोलक करणाऱ्या महिला उशिरा आलेल्या होत्या. प्रत्यक्षात निवड प्रक्रियेची वेळ ही सकाळी ८ वाजताची होती. मात्र, अनेक महिला या सकाळी १० च्या सुमारास पोहोचल्या. त्यामुळे आम्ही उशिरा दाखल झालेल्या उमेदवारांना परवानगी नाकारली. असे मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT