मुंबई

एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड यांच्यानंतर आणखी एक बडा नेता NCP मध्ये; अजितदादा म्हणतात "असा नेता देशात कुणी नाही"

संजय मिस्कीन

मुंबई, ता. 16 : पायाला भिंगरी बांधल्यासारखे  शरद पवार आज काम करत आहेत. या वयातही प्रचंड काम करणारा नेता देशात दुसरा कुणी नाही हे नाकारता येणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या असंख्य कारकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला, त्यावेळी अजित पवार बोलत होते. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला.

राजकीय जीवनात पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 30 वर्षे काम करतोय. यामध्ये अनेक लोकांची ओळख होत असते. त्यामध्ये जनसुराज्य पक्षाचे काम करताना राजीव आवळे यांचं काम मी पाहत आलो आहे. ते गरीब व वंचित वर्गासाठी  काम करत आहेत असेही अजित पवार म्हणाले. 

यावेळी महाविकास आघाडीचे सरकार असून आमची मदत करण्याची भूमिका असणार आहे. आता कोल्हापूर जिल्हयात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीमध्ये अधिक सदस्य कसे येतील असे काम करावे लागणार आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले. 

देशासमोर शेतकर्‍यांचा प्रश्न आ वासून उभा आहे. केंद्राकडून प्रश्न सोडवले जात नाहीय. मात्र आम्ही सर्व घटकांना न्याय देणारे आहोत. इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

ताकद वाढविण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. कोल्हापूर जिल्हयात आणखी चांगली संघटना वाढवूया. इचलकरंजी, हातकणंगले या भागातील बर्‍याच प्रश्नांना दादांनी न्याय दिला आहे. राजीव आवळे यांचासारखा एक चांगला माणूस आपल्या पक्षात येत आहे त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले. 

भाजपने धमक्या दिल्या होत्या आणि प्रवेश करुन घेतला होता ते सर्व आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्याची सुरुवात आज राजीव आवळे यांच्या प्रवेशाने होत आहे असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले. आपलेपण राष्ट्रवादीत मिळालं आहे. 2021 मध्ये राज्यातील मातंग समाजात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे आश्वासन माजी आमदार राजीव आवळे यांनी प्रवेश करताना दिले. 

Former MLA Rajiv Awale joined NCP big blow to BJP maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: एकमेकांवरील हल्ले अजूनही सुरूच; मृतांची संख्या चौदाशेहून अधिक, इराणमध्ये मोठे नुकसान

Jyoti Waghmare : राज्यसभेवर जाणाऱ्या ज्योती वाघमारे ठरल्या सोलापूर जिल्ह्यातील तिसऱ्या नेत्या; यापूर्वी कोणाला मिळाली होती संधी? एकनाथ शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक' चर्चेत!

Missile Attack Crude Oil Tanker : इस्त्राईल-इराण युद्धात क्रूड ऑईल जहाजावर क्षेपणास्त्र हल्‍ला, कोल्हापूरचा रोहित पाटील जहाजात; अनेकांना बहरीनमध्ये हलवलं

IND vs NZ Final: ७ सामन्यांत १२.७१ ची सरासरी अन् ८९ धावा! अभिषेक शर्मा OUT, रिंकू सिंग IN? वर्ल्ड कप फायनलसाठी भारताच्या Playing XI मध्ये दोन बदल अपेक्षित

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

SCROLL FOR NEXT