मुंबईतील सांडपाण्यात कोरोना विषाणू; ICMR चा अहवाल मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय

मुंबईतील सांडपाण्यात कोरोना विषाणू; ICMR चा अहवाल मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय

मुंबई : मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे. त्यातच पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव सांडपाण्यातून होत असल्याचे आयसीएमआरच्या अहवालातून समोर आले आहे. आयसीएमआरने मे महिन्यात मुंबईतील काही भागांतील सांडपाण्याचे नमुने घेतले होते. दरम्यान, सांडपाणी वापरात येत नसल्याने मुंबईकरांना धोका नसल्याचे स्पष्टीकरण पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहे. 

मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मुंबईत आढळला त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आणण्यात पालिकेला यश येत आहे. तर 11 ते 22 मे 2020 दरम्यान इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) गोळा केलेल्या नमुन्यातील आवाहलातून ही माहिती समोर आली आहे. 

धारावीसह सहा विभागातील सांडपाण्यातील नमुने आयसीएमआरने घेतले होते. मात्र, या प्रकारे सांडपाणी वा गटाराच्या पाण्यात करोनाचे संसर्ग आढळल्यास कोणताही धोका नसल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आयसीएमआरचा अहवाल मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. 

पण मुंबईकरांना धोका नाही, पालिकेचं स्पष्टीकरण -

आयसीएमआरने मुंबईतील वडाळा, धारावी, कुर्ला, शिवाजी नगर, मालाड, कांजूरमार्ग अशा सहा ठिकाणी मलनिःसारण वाहिनीच्या पाण्याचे नमुने गोळा केले होते. 16 मार्चच्याआधी घेतलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळला नव्हता, मात्र 11 ते 16 मे दरम्यान घेण्यात आलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळून आल्याचं आयसीएमआरने अहवालात म्हटलंय.

मुंबईत सहा ठिकाणी घेण्यात आलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळल्याचे म्हटले आहे. त्याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, असा अहवाल आमच्यापर्यंत अद्याप आलेला नाही. असा अहवाल आला असल्यास हा अहवाल जुना असेल. मुंबई महापालिका मलनिःसारण वाहिन्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करते. प्रक्रिया केलेले पाणी समुद्रात सोडण्यात येते. या पाण्याचा मुंबईकर नागरिकांशी थेट संपर्क येत नाही. यामुळे मुंबईकरांना याचा धोका नाही. मलनिःस्सारण वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची, सफाई कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येते. त्यात सुमारे एक टक्के कर्मचारीच पॉझिटिव्ह आढळतात. यामुळे भीतीचे काहीही कारण नाही, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

covid 19 virus found in waste water of mumbai ICMR report

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com