मुंबई

गणेशोत्सवात जुगार खेळणारे हिटलिस्टवर; या जिल्ह्यात आठ जण ताब्यात

प्रमाेद जाधव

अलिबाग  : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रायगड पोलिसांनी जुगार आणि दारूच्या बेकायदा अड्ड्यांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार 
जिल्ह्यातील अलिबाग, रेवदंडा, रोहा, माणगाव, नेरळ या पाच पोलिस ठाण्यांनी गावठी दारूची वाहतूक आणि जुगार खेळणाऱ्या आठ जणांविरोधात कारवाई केली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

गणेशोत्सवात काही समाजकंटक आर्थिक फायद्यासाठी बेकायदा जुगार आणि दारूचे अड्डे चालवतात. या प्रकारामुळे उत्सवाला गालबोट लागण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली खबऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीर व्यवसायांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार माहिती घेऊन जुगार आणि बेकायदा दारू विक्री- वाहतूक करणाऱ्यांवर 20 ते 22 ऑगस्ट या कालावधीत कारवाई करण्यात आली. यामध्ये माणगाव येथील विळे आदिवासीवाडी येथे माणगाव पोलिसांनी छापा टाकून गावठी दारू जप्त केली. रोहा पोलिसांनी वांदोली आदिवासीवाडी व खैरवाडी या दोन ठिकाणी छापा टाकून सुमारे 45 लिटरची गावठी दारू जप्त केली आहे. 

रेवदंडा पोलिसांनी सुपेगाव फाटा जवळील तळेखार येथे छापा टाकून दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. अलिबाग शहरातील पीएनपी नगर येथील रिक्षा स्थानकाजवळील पत्र्याशेडमध्ये, तसेच थळ येथील आठवडा बाजार येथील पत्र्याच्या शेडमध्ये अलिबाग पोलिसांनी छापा टाकून मटका चालविणाऱ्यांविरोधात कारवाई केली. नेरळ येथील बाजार पेठेत मोबाईलवर मटका जुगार चालविणाऱ्यांवर नेरळ पोलिसांनी छापा टाकला. दारूची वाहतूक व साठा करणारे चार जण व मटका जुगाराचा अड्डा चालविणारे चार जण अशा एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Property Expo : पुण्यात घर घ्यायची सुवर्णसंधी ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’ उद्यापासून; गुंतवणुकीचे पर्याय एकाच छताखाली

MPSC Result : क्लास वन अधिकारी होऊन केले वडिलांचे स्वप्न पूर्ण, सातारारोडच्या कन्येची भरारी; MPSC परीक्षेत राज्यात पटकावला नववा क्रमांक

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्र निमित्त वेरूळ येथे श्री घृष्णेश्वर मंदिरात महास्वच्छता अभियान

Pune Crime : मुलाने दारुच्या नशेत वडिलांना जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू; पुण्यात धक्कादायक घटना

Vasai Fire: वसईत कंपनीला भीषण आग! आगीचा भडका अन् धुराचे लोट परिसरात पसरले; घटनेनं भीतीचं वातावरण, Video Viral

SCROLL FOR NEXT