esakal | ट्रॉम्बे परिसरात रस्त्याला मोठे भगदाड; भुमिगत जलवाहिनीला गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रॉम्बे परिसरात रस्त्याला मोठे भगदाड; भुमिगत जलवाहिनीला गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

ट्रॉम्बे पोलिस स्थानकाजवळ भुमिगत जलवाहिनीला गळती लागून रस्त्याला भगदाड पडले आहे.साधार 4 ते 5 फुट खुल आणि 10 फुट रुंदीचा हा खड्डा आहे.जलवाहीनीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने चिता कॅम्प परीसरातील पाणीपुरवठ्यावर परीणाम झाला आहे.

ट्रॉम्बे परिसरात रस्त्याला मोठे भगदाड; भुमिगत जलवाहिनीला गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

sakal_logo
By
समीर सुर्वे

मानखुर्द : ट्रॉम्बे पोलिस स्थानकाजवळ भुमिगत जलवाहिनीला गळती लागून रस्त्याला भगदाड पडले आहे.साधार 4 ते 5 फुट खुल आणि 10 फुट रुंदीचा हा खड्डा आहे.जलवाहीनीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने चिता कॅम्प परीसरातील पाणीपुरवठ्यावर परीणाम झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये यु ट्युब व्हिडिओ पाहून केली 7 स्पोर्ट्स बाईकची चोरी; पोलिसांनी केली अटक

ट्रॉम्बे येथील एस्सेल स्टूडिओ जवळील कोळीवाड मार्गावर 24 इंचाची भुमिगत जलवाहनी आहे.या जलवाहीनीला गळती लागल्यामुळे हा रस्ता खचला असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.तर,गळती मुळे लाखो लिटर पाणीही वाया गेले आहे.पालिकेच्या जलअभियंता विभागाने या जलवाहीनीतील पाणी पुरवठा बंद करुन तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

'बघा रे याला' असं म्हणत पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की; राष्ट्रवादीचे पदाधिकारी अटकेत

पालिकेने जलवाहीनी दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु केले असून मध्यरात्री पर्यंत काम पुर्ण होईल असे एम पुर्व प्रभागाचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रणजीत चव्हाण यांनी सांगितले.जलवाहीनीतील पाणी पुरवठा बंद केल्याने चिता कॅम्प परीसरात आज पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही.मात्र,दुरुस्ती पुर्ण झाल्यानंतर सुरळीत पाणी पुरवठा सुरु होईल असे पालिकेकडून सांगण्यात आले.

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top