esakal | डहाणू तलासरी परिसर पुन्हा भूकंपाने हादरला; दिवसभरात अनेक सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणू तलासरी परिसर पुन्हा भूकंपाने हादरला; दिवसभरात अनेक सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आज सकाळपासून भूकंपाची सहा सौम्य धक्के बसल्याने पुन्हा येथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

डहाणू तलासरी परिसर पुन्हा भूकंपाने हादरला; दिवसभरात अनेक सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

sakal_logo
By
प्रविण चव्हाण

तलासरी : पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यातील गावे पुन्हा भूकंपाने हादरली, शनिवारी मध्यरात्री पासून ता 23 ऑगस्ट रोजी दिवसभर दोन्ही तालुक्यातील गावांना सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे 9 भूकंपाचे धक्के बसले. यामध्ये 11.39 बसलेला धक्का 2.8 रिस्टर स्केल क्षमतेचा झाल्याची नोंद झाली असून सायंकाळी 5 वाजून 8 मिनिटांनी बसलेला धक्का 2.3 रिस्टर स्केल क्षमतेचा होता.

'बघा रे याला' असं म्हणत पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की; राष्ट्रवादीचे पदाधिकारी अटकेत

धुंदलवाडी, आंबोली, ओसारविरा, कासा, चारोटी, भागात या  भूकंपाचा धक्का जाणवला, सद्या कोरोनाच्या संकटाने नागरिक घाबरले आहेत त्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि पुन्हा आज भूकंम्प चा धक्का, त्या मुळे भीतीच्या वातावरणात भर पडली,सद्या गणेशोत्सव सुरू असून उभा भूकंम्प च्या जाणवलेली धक्का ने या भागातील नागरिकांच्या समस्येत वाढ झाली.

'मुंबईतील कोरोनासंदर्भात तातडीने श्वेतपत्रिका काढा'; मुंबई भाजपची आयुक्तांकडे मागणी

गेल्या काही दिवसापासून भूकंपाचे धक्के बसण्याचे थांबले होते मात्र पुन्हा धक्के बसू लागल्याने नागरिक चिंतीत असून आंबोली ,दापचरी धुंदलवाडी या भागात बसणारे हादरे आता तलासरी, कासा, उपलाट यामध्ये बसताना दिसून येत आहे . भूकंपाचा केंद्र बिंदू ही नेहमी सरकत असल्याने नागरिकांमध्ये भीती वाढू लागली आहे.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top