Electronic Bus
Electronic Bus sakal
मुंबई

Ulhasnagar News : उल्हासनगर परिवहन सेवेच्या इलेक्ट्रॉनिक बसमध्ये प्रवाशांना दोन दिवस फ्री प्रवासाची गिफ्ट

दिनेश गोगी

उल्हासनगर - लोकार्पण झाल्यावर चार्जिंगच्या तांत्रिक कारणास्तव दुसऱ्याच दिवशी थांबलेल्या उल्हासनगर महानगरपालिका परिवहन सेवेच्या इलेक्ट्रॉनिक बसेस आता रोडवर धावू लागल्या आहेत. अशात आयुक्त अजीज शेख यांनी प्रवाशांना 12 व 13 असे दोन दिवस फ्री प्रवासाची गिफ्ट दिली आहे.

केष्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांनी 2009 ते 2014 या कालावधीत करार तत्वावर पालिकेची परिवहन सेवा हाताळली होती. मात्र सातत्याने पेट्रोलची दरवाढ होत असताना वारंवार प्रवासी भाड्यात भाडेवाढ करून देण्याच्या मागणीकडे डोळेझाकपणा करण्यात येत असल्याने गेमनानी यांनी परिवहन सेवेचा गाशा गुंडाळला होता. तेंव्हापासून परिवहन सेवा ठप्प पडलेली होती.

अशावेळी अजीज शेख यांनी दोन वर्षांपूर्वी आयुक्त पदाचा पदभार हाती घेतल्यावर त्यांनी परिवहन उपआयुक्त अशोक नाईकवाडे व वाहन व्यवस्थापक विनोद केणे यांना परिवहन सेवेच्या निविदेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. त्याचे फलित मिळाले आणि पुण्याच्या कंपनीला परिवहन सेवा हाताळण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले.

कंपनीने प्रथम पुण्यातील भोसरीमध्ये 20 बसेस तयार करण्याचे काम सुरू केलेले आहे. त्यापैकी धावण्यासाठी सज्ज असलेल्या 5 बसेस उल्हासनगरात दाखल झाल्या होत्या. मंत्रालयातून तिकीट दरावर शिक्कामोर्तब झाल्यावर रविवारी 10 मार्च रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून परिवहन सेवेचे लोकार्पण केले होते.

मात्र दुसऱ्याच दिवशी चार्जिंगच्या तांत्रिक कारणास्तव बस धावू शकल्या नव्हत्या. 12 तारखेपासून दोन बसेस शहाड ते कॅम्प नंबर 5 कैलास कॉलनी मार्गावर धावत असून त्यात आयुक्त अजीज शेख यांनी प्रवाशांना 12 आणि 13 मार्च असे दोन दिवस फ्री प्रवासाची गिफ् दिली आहे.

25 मार्च रोजी 5 एसी बस दाखल होणार असून, सर्व 10 बसेस वेगवेगळ्या रूटवर धावताना दिसणार आहेत. त्यासाठी वाहक-चालकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. वाहकांत महिलांचा देखील समावेश आहे. ई-तिकिटांची व्यवस्था देखील असून त्यासाठी बसमध्ये क्यूआर कोड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT