Jai Bhavani Building Fire
Jai Bhavani Building Fire sakal
मुंबई

Goregaon Fire Incident : गोरेगाव दुर्घटनाग्रस्त ५० रहिवाशांना पालिका शाळेत आसरा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गोरेगाव मधील दुर्घटनाग्रस्त जयभवानी इमारत रिकामी करण्यात आली असून, काही रहिवासी नातेवाईकांकडे गेले असून ५० हून अधिक रहिवाशांना पालिकेच्या शाळेत आसरा देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त राजेश अक्रे यांनी दिली. इमारतीच्या इलेक्ट्रिक वायरिंगचे ऑडिट झाल्याचे त्यांनी सांगितले.

गोरेगाव पश्चिम एमजी रोड, उन्नत नगर, आझाद मैदान जवळ 'जय भवानी' ही तळ अधिक सात मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये रात्री गुरुवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास भीषण लागल्याची घटना घडली. पार्किंग मध्ये अग्नी भडका उडाला असून आगीत पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या गाड्या, कपडे असल्याने काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले.

या दुर्घटनेत ७ मृत्यू तर ६२ जण जखमी झाले असून जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आगीमुळे इमारतीत धुराचे लोट पसरले आणि इमारतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. इमारतीतील काही रहिवाशांनी नातेवाईकांकडे गेले पसंत असून ५० हून अधिक रहिवाशांना जवळील पालिकेच्या शाळेत आसरा देण्यात आला आहे. आगीमुळे इमारतीचे नुकसान झालेले नाही, त्यामुळे स्ट्क्चरल ऑडिट करण्याची गरज नाही.

इमारतीतील इलेक्ट्रिक वायरिंगचे ऑडिट पूर्ण झाले आहे. शुक्रवारी दिवसभर रहिवाशांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे यावर लक्ष केंद्रीत केले होते. मात्र आता इमारतीतील वीजपुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला असून संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल आणि रहिवासी इमारतीत राहण्यास येतील, असे ही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT