मुंबई

स्व मूल्यमापनात १५८० शाळांना ‘अ’ श्रेणी

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग (बातमीदार) : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शाळा सिद्धी उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील तीन हजार ६५८ शाळांनी ठरवलेल्या निकषांवर स्वत:चे मूल्यमापन केले. या मूल्यमापनात १५८० शाळांना ‘अ’ श्रेणीचा दर्जा प्राप्त झाला आहे.

शालेय, शिक्षण व क्रीडा विभागाच्या ७ जानेवारी २०१७ मधील शासन निर्णयानुसार, शाळा सिद्धी या कार्यक्रमाची अंमलबजावणी समृद्ध शाळा या नावाने केली आहे. शाळा सिद्धी कार्यक्रमांतर्गत शाळांचे स्व मूल्यांकन करणे आणि त्यापैकी किमान शाळांना समृद्ध शाळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्व मूल्यमापनासाठी शाळेचे सामर्थ्य स्त्रोत, अध्यापन-अध्ययन व मूल्यमापन, अध्ययनार्थीची प्रगती, संपादणूक व विकास, शालेय नेतृत्व व व्यवस्थापन उत्पादक समाज सहभाग या सात क्षेत्रांचा समावेश असून ४६ मानांकनाचा समावेश आहे. त्यात शालेय आवार, क्रीडा उपकरणे व साहित्यासह मैदान, वर्गखोल्या व इतर खोल्या, वीज व विद्युत उपकरणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक, उतरता रस्ता, भोजन स्वयंपाक खोली व भांडी, पेयजल, हात धुण्याची सुविधा, स्वच्छतागृह, शिक्षकांना अध्ययनार्थीची जाण, शिक्षकांचे विषय व अध्यापन शास्त्रीय ज्ञान,  अध्यापनाचे नियोजन, अध्ययनपूरक वातावरण निर्मिती, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, वर्ग व्यवस्थापन, शाळा सुधारण्यात भूमिका, शाळा विकास व्यवस्थापन समितीचे संघटन व व्यवस्थापन आदींचा समावेश आहे. 

२०१८-२०१९ शाळा सिद्धी पोर्टलनुसार, जिल्ह्यातील तीन हजार ६५८ शाळांचे स्वयं मूल्यमापन शिक्षकांमार्फत करण्यात आले. जिल्ह्यातील १५८० शाळांना अ श्रेणी, १८९४ शाळांना ब श्रेणी; तर १८४ शाळांना क श्रेणी प्राप्त झाली आहे. या शाळांचे बाह्य मूल्यमापन नवी दिल्ली येथील न्युईपा (NUEPA) यांच्याकडून होणार आहे. 

शिक्षकांना प्रशिक्षण
२०१९-२०२० च्या शाळा स्वयं मूल्यमापनमध्ये जास्तीत जास्त शाळांना ‘अ’ श्रेणी प्राप्त व्हावी, यासाठी स्वदेश फाऊंडेशनमार्फत तळा, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, महाड, माणगाव आणि सुधागड तालुक्‍यांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिक्षकांचे सक्षमीकरण झाल्यास विद्यार्थ्यांची गुणवत्ता व पर्यायाने शाळेची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT