रशियातील एल्ब्रुस शिखर सर करणारी हर्षाली वर्तक.
रशियातील एल्ब्रुस शिखर सर करणारी हर्षाली वर्तक. 
मुंबई

वसईतील हर्षालीची रशियातील एल्ब्रुस शिखरावर यशस्वी चढाई

सकाळ वृत्तसेवा

वसई ः वसईतील हर्षाली वर्तक हिने आतापर्यंत अनेक शिखरे पार करून देशाचे नाव उज्ज्वल केले. शुक्रवारी (ता. 16) तिने युरोप खंडातील रशियाच्या एल्ब्रुस शिखरावर भारताचा झेंडा रोवला. जगातील सात खंडापैकी किलिमांजरो आणि एल्ब्रुस शिखर ही सर्वाधिक उंचीची शिखरे पार करून तिने याही पुढे जाण्याची तयारी करणार असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सह्याद्री रांगेतील हिरकणी म्हणून ओळख असलेल्या वसईतील हर्षाली हिने अनेक शिखरांची यशस्वी चढाई केली आहे. ऊन, पाऊस, हिवाळा याची पर्वा न करता तिने महाराष्ट्रातून सुरू केलेला हा प्रवास आज विदेशापर्यंत नेला आहे. जिद्दीच्या जोरावर हर्षाली हिने 10 दिवसांत 5 हजार 360 मीटर सायकल प्रवास जुलैमध्ये केला. 92 सायकलस्वारांमध्ये वसईची हर्षाली ही मुलींमध्ये एकटीच या शिखरावर गेली होती आणि आता तिने रशियावरदेखील झेंडा रोवला आहे. 

देश-विदेशातील 11 जणांचा सामावेश एल्ब्रुस शिखरावर जाण्यासाठी करण्यात आला होता. या शिखराची उंची 18 हजार 510 फूट आहे. त्यातील 7 जण शिखरावर पोहचले. या ठिकाणचे तापमान उणे 25 असून, बाराही महिने बर्फाच्छादित परिसर आणि 35 मैल इतका वारा येथे असतो. शिखराच्या टोकावर जाण्यासाठी 9 तास इतका वेळ लागतो, तर खाली उतरण्यासाठी 5 तास अवधी लागतो. हा सर्व प्रवास बर्फातून करावा लागला; मात्र यातून अनेक अनुभव गाठीशी बांधत खडतर प्रवास केल्याचे हर्षालीने सांगितले. 

युरोप खंडातील रशियाच्या एल्ब्रुस शिखरावर जाण्याची संधी मिळाली. ती न दवडता तेथे जाण्याचे ठरवले. घरातूनही त्यासाठी प्रोत्साहन मिळाले आणि मी जाण्याची तयारी केली. या शिखराच्या टोकावर जाण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले, याचे समाधान आहे. 
हर्षाली वर्तक, गिर्यारोहक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT