file photo
file photo 
मुंबई

घरगुती गणपतींनाही वस्त्रालंकाराचा शृंगार! 

उत्कर्षा पाटील

मुंबई : मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांत गणपतीला पितांबर व शेला नेसवला जातो, पण आता घरगुती गणपतीला पितांबार आणि शेला नेसवण्याच्या मागणीत वाढ होत आहे. गणरायाला पितांबर आणि शेला नेसवल्याने त्याचे रूप अधिक मोहक दिसते. त्यामुळे दोन वर्षांत गणरायासाठीच्या वस्त्रालंकाराच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे.

प्रतीक आर्टस्‌चे स्वप्नील जोगदनकर गेली सहा वर्षे गणपतीला वस्त्र नेसवण्याचे काम करतात. स्वप्नील यांनी त्यांच्या मावशीकडे बसवण्यात आलेल्या गणपतीला पितंबार व शेला नेसवला. हळूहळू त्यांच्या या कौशल्याला लोकांकडून मागणी येत गेली. या वर्षी 100 हून अधिक घरगुती गणपती व 10 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पितांबर आणि शेला नेसवण्यासाठी मागणी आली असल्याचे स्वप्नील यांनी सांगितले.

पितांबर व शेला गणपतीचे विसर्जन होईपर्यंत टिकवण्यासाठी डिंकाने ते मूर्तीवर चिटकवून नेसवले जाते. यामध्ये विविध प्रकारच्या कपड्यांचा वापर करून त्याला जरीची किनार जोडली जाते. लोकांच्या इच्छेनुसार पितांबरचे कापड व शेला नेसवून दिला जातो असे स्वप्नील म्हणाले. 
पितांबर नेसवण्यासाठी गोल्ड कॉईन, निऑन पेपर सिल्क, बुट्टी कॉटन, सॅटिन अशा विविध मटेरिअलचा वापर केला जातो. अडीच फुटाच्या गणपतीच्या मूर्तीला पितांबर नेसवायला दीड ते दोन मीटर कापड लागते.

कापडाला जरीची, काठाची, इरकली काठ, पैठण काठ असे विविध डिझाईनची किनार लावली जाते; तर शेल्यासाठी वेलवेट, बुट्टी कॉटन, कुंदन डिझाईन असे प्रकार आहेत. ग्राहकांना पैठणी, इरकली साडीमधील पितांबर व शेलाही नेसवून दिला जातो. अडीच फुटाच्या गणपतीसाठी वस्त्र नेसवण्यासाठी दीड हजार ते 1800 रुपये घेतले जातात; तर त्याहून मोठ्या मूर्तींच्या दरामध्ये वाढ होते, असे स्वप्नील यांनी सांगितले. पितांबरच्या मटेरियलमध्ये गणपतीसाठी फेटा बांधून मिळतो. काही मोठ्या मंडळांमध्ये दररोज पितांबर नेसवले जाते. पितांबर व शेले शाडू मातीच्या आणि पीओपी मूर्ती या दोन्हींमध्ये नेसवून मिळते. 

गणपतीला हिऱ्यांचे वर्क 
वस्त्रांसोबत गणपतीला हिऱ्यांचे वर्क करण्याची नवी फॅशन अलीकडे वाढली आहे. यामध्ये गणपतीचे मुकुट, बाजूबंद, हातातील कडे, गळ्यातील दागिने, पायातील वाळे यांना डायमंड वर्क केले जाते. लालबाग, गिरगाव परिसरातील मूर्तिकारांकडे अशा प्रकारचे हिऱ्यांचे वर्क करून मिळते. 

लोकांना गणपतीसाठी नवनवीन ट्रेंड हवा असतो. गेल्या वर्षापासून गणपतीला वस्त्र नेसवण्याचा ट्रेंड आला. आता या वस्त्र नेसवण्याच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. आमच्याकडील 50 टक्‍क्‍यांहून अधिक मूर्तींना पितांबर आणि सोहळे ग्राहकांनी नेसवून घेतले आहे. 
- सागर पांचाळ, मूर्तिकार, अतुल सागर आर्टस्‌ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT