घणसोलीतील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
घणसोलीतील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा 
मुंबई

घणसोलीतील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : घणसोली गावातील रिक्षाचालक अनिल म्हात्रे यांनी आपल्या रिक्षात प्रवाशाचे विसरलेले ५० हजार रुपये परत करून दाखवलेल्या प्रामाणिकपणाला चार दिवस होत नाहीत, तोच पुन्हा एकदा घणसोलीतील रिक्षाचालक दिनेश पाटील यांच्या रिक्षात प्रवाशाचे विसरलेले पाकीट परत करून त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला.

घणसोली गावातून महाविद्यालयीन विद्यार्थी अक्षय शिर्के सोमवारी (ता.११) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घणसोली रेल्वेस्थानकात जाण्यासाठी दिनेश पाटील यांच्या रिक्षात बसले होते. त्यांना घणसोली स्थानकाबाहेर सोडल्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर पाटील यांना रिक्षात पाठीमागे एक पाकीट आढळून आले. त्या पाकिटात एटीएम कार्ड, आधार कार्ड व वाहन परवान्यासह पाचशे रुपये असा ऐवज होता. हे पाकीट पाटील यांनी उघडले असता त्यातील आधार कार्डवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर अक्षय शिर्के या तरुणाला फोन करून संपर्क साधला व त्याचे पाकीट आपल्या रिक्षात विसरले आहे, असे सांगितले. त्यानंतर अक्षय शिर्के हे घणसोली रेल्वे स्टेशनजवळील रिक्षा थांब्यावर आले असता पाटील यांनी शिर्के यांना त्यांचे पाकीट परत केले. त्यामुळे रिक्षाचालक दिनेश पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT