मुंबई

कोविडग्रस्त मुलांना कोविडमुळे झालीये दुर्मिळ आजाराची लागण; अवयव झाले निकामी, ह्रदयावरही परिणाम

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईच्या परळ येथील लहान मुलांच्या बाई जेरबाई वाडिया रूग्णालयातील 100 कोविड ग्रस्त मुलांपैकी 18 मुलांना कोविडमुळे दुर्मिळ आजाराचं निदान झालं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे या लहान मुलांमध्ये अवयव निकामी आणि ह्रदयावर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. त्यातून एका 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर 24 तासाच्याआत या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर, दुसरी 4 वर्षांची मुलगी अशाच कारणांनी सध्या व्हेंटिलेटरवर उपचार घेत होती. शिवाय, अशा प्रकारे कोविडमुळे लहान मुलांना इतर आजार होऊन मृत्यू झाल्यामुळे या घटनेची आयसीएमआरला देण्यात येणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून वाडिया रूग्णालयात 100 कोरोना पाॅझिटीव्ह मुलांवर उपचार केले जात आहेत. त्यापैकी 18 मुलामुलींना पीएमआयएस म्हणजेच पेडिऍट्रिक मल्टिसिस्टिम इन्फ्लॅमेटरी सिड्रोम या दुर्मिळ आजाराची लक्षणे दिसली. त्यातील एकीला आपला जीव गमवावा लागला तर, दुसऱ्या मुलीवर गेल्या 12 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेऊन उपचार सुरू होते. सोमवारी तिला जनरल वाॅर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.

पीएमआयएस हा एक जीवघेणा दुर्मिळ आजार आहे. जो लहान मुलांना कुठलाही संसर्ग झाला की होऊ शकतो. ज्यात ताप आणि अवयव निकामी होतात. शिवाय, त्वचेवर चट्टे आल्यानंतर काही काळाने ह्रदय, धमन्या, किडनी, फुप्फुस आणि दुसऱ्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो. अशात जर योग्य उपचार नाही झाले तर मृत्यू देखील ओढावू शकतो. हा एक दुर्मिळ आजार असुन कोविडच्या संसर्गामुळे मुलांमध्ये हा आजार आढळून आला आहे, असं जनरल फिजीशियन डाॅ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले आहे.

लहान मुलांना कोविडचा संसर्ग झाला तर पुढच्या 3 ते 4 आठवड्यात पीएमआयएसची लक्षणे मुलांमध्ये दिसतात असं डाॅक्टरांच्या निरीक्षणातून आणि अभ्यासातून समोर आले आहे. 

ब्रोकन हार्ट सिंड्रोम ठरतोय जीवघेणा - 

PMIS सोबत या लहान मुलांमध्ये ब्रोकन हार्ट सिंड्रोम या आजाराची देखील लक्षणे दिसून आली आहेत. जो आतापर्यंत फक्त तरुणांमध्ये किंवा मध्यम वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतो. हा सिंड्रोम आतापर्यंत एकाही लहान मुलामध्ये आढळलेला नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. ब्रोकन हार्ट सिंड्रोममध्ये रुग्णाच्या ह्रदयात स्ट्रोक येतो आणि ह्रदयावर त्याचा परिणाम होतो. 

सध्या वाडिया रूग्णालयात चार वर्षांची मुलगी या आजाराला गंभीररित्या लढा देत आहे. ही मुलगी जुलै महिन्यात रुग्णालयात ह्रदयाच्या ठोक्यांची समस्या, कमी रक्तदाबाची समस्या आणि न्यूमोनियाची लक्षणे घेऊन दाखल झाली होती. त्यानंतर तिला लगेचच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि तिचा रक्तदाब सुधारावा म्हणून उपचार केले गेले. आधी तिची कोविड चाचणी निगेटीव्ह आली होती. आणि आणखी एक चाचणी केल्यानंतर तिला PMIS हा आजार असू शकतो असे निदान डाॅक्टरांनी केलं. त्यानंतर तिची अँटीबाॅडीज चाचणी केली ती पाॅझिटीव्ह आली. त्यानंतर, ती कधीतरी कोरोनाच्या संसर्गात आली असावी असं स्पष्ट झालं. तिच्यावर तात्काळ या संबंधित उपचार केले गेले आणि आता या मुलीची हळूहळू प्रकृती सुधारत असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले आहे. 

गेल्या तीन महिन्यांपासून रुग्णालयात लहान मुलांसाठी कोविड 19 वाॅर्ड सुरू करण्यात आला आहे. ब्रोकन हार्ट सिंड्रोम आणि कोविड 19 मध्ये काय संबंध आहे यावर डाॅक्टर्स सध्या अभ्यास करत आहेत. कारण, हा सिंड्रोम लहान मुलांमध्ये आढळत नाही. याबाबतचा पत्र व्यवहार लवकरच ICMR सोबत केला जाणार आहे असं वाडिया रुग्णालयाच्या CEO डॉक्टर मिनी बोधनवाला यांनी म्हटलंय. 

( संपादन - सुमित बागुल  )

horrible Pediatric Multisystem Inflammatory Syndrome seen in indian children

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT