मुंबईतील कोरोना नियंत्रणाचं जगभरात कौतुक, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात...

मुंबईतील कोरोना नियंत्रणाचं जगभरात कौतुक, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात...

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली पाहायला मिळतेय. मुंबईत जे रुग्ण आढळून येतायत त्यांच्यातही लक्षणं नसणारे रुग्ण अधिक असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत हे शहर खरंतर अत्यंत जास्त लोकसंख्येचं. धारावीसारख्या अनेक ठिकाणी अगदी कमी भागात लाखो लोकं या शहरात राहतात. अशातही रात्रंदिवस मेहनत करून महापालिकेने मुंबईसारख्या मोठी घनता असलेल्या शहरात कोरोना नियंत्रणात ठेवलाय. याचं साऱ्या जगभरात कौतुक होतंय. पण कौतुक जरी होत असलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र याबाबत एक अत्यंत सूचक विधान केलंय. 

काय म्हणालेत मुख्यमंत्री ?  

मुंबई सारख्या लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या शहराकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. आपण मेहनतीने प्रयत्नपूर्वक कॉर्नचा संसर्ग रोखला आहे. त्याची दखल WHO नेही घेतली आहे. वॉशिंग्टन पोस्टनेही मुंबईचं कौतूक केले आहे. मात्र आता आपली आणखी कसोटी आहे. त्यामुळे गाफील न राहता कोरोनाच्या रुग्ण संख्येचा आलेख कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

आपण कोणतीही माहिती लपवत नाही

मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रतिबंध तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईची परिस्थिती तुम्ही सर्वांनी अहोरात्र मेहनतीने रोखली आहे. आपण कोणतीही माहिती लपवत नाही, याचे कौतूक वाँश्गिटन पोस्टने केले. या कौतुकास्पद परिस्थितीतही आता आपली कसोटी आहे. जगभर जे निरीक्षण आहे, त्यामध्ये आता दुसऱी लाट येईल असे म्हटले जाते. त्यामुळे आपले प्रयत्न आणखी तीव्रतेने आणि प्रभावीपणे राबवा. दुसरी लाट तेव्हाच येते ज्यावेळी आपण गाफील राहतो. पण आणखी सतर्क राहूया. रुग्ण संख्येचा हा आलेख कमी होईल यासाठी प्रयत्न करूया.  

सर्व गोष्टी काटेकोरपणे करायच्या आहेत

रुग्णाला कमीत कमी अंतरावर उपचारासाठी जावे लागेल अशा सुविधा वाढवायच्या आहेत. सुरवातीला कोरोना शहरात होता. पण आता प्रसार ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. राज्याच्या अन्य भागातही या सुविधांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. हळू हळू आपण मुंबई खुली करतो आहोत. त्यासाठी कुणाचा दबाव घेण्यापेक्षा आपण नागरिकांच्या जीवांशी बांधिल आहोत, अशा पद्धतीने काम करत आहोत. आपल्याला या सर्व गोष्टी काटेकोरपणे करायच्या आहेत. मुंबईला तुम्हा सर्वांच्या अनुभवातून पुर्वपदावर आणायचे आहे. त्यासाठी यंत्रणांना आणखी सतर्क करा. व्ह्यक्सीन येईपर्यंत आरोग्य सुविधांच्या दृष्टीने आणखी काही गोष्टी साध्य करण्याचे प्रयत्न आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईतील नाले सफाई आणि पावसाळ्यातील साथीचे आजार रोखण्याच्या दृष्टीनही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ते म्हणाले, नाले सफाई वर्षोनुवर्ष करतो. पण साफ झालेला नाला पुन्हा काही दिवसांत कचऱ्याने भरतो. आता कोरोनाच्या निमित्ताने आपल्या टीम बाहेर आहेतच. त्यांच्याकडून या कचरा टाकण्यावर लक्ष ठेवा.

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींकडेही लक्ष देण्याची गरज आहे. त्याठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर आदी अनुषंगीक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात याची काळजी घ्या. मुंबईतील गणेशोत्सव त्यातील सार्वजनिक तसेच कौटुंबिक उत्सव, गणेशाचे आगमन आणि विसर्जन व्यवस्था तसेच कोकणात गणेशोत्सवासाठी जाऊन येणारे नागरिक यांच्यापर्यंत मार्गदर्शक सूचना, वस्तूस्थितीची माहिती वेळेत पोहचविण्यात यावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

महापालिका आयुक्त चहल म्हणाले

महापालिका आयुक्त चहल म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मुंबईतील 831 प्रतिबंधित क्षेत्र 153 ने कमी करण्यात यश आले आहे. सील इमारतींची संख्या कमी करण्यावरही लक्ष केंद्रीत करणार आहोत. रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीए आणि महापालिका एकत्र येऊन समन्वयाने डॅश बोर्ड प्रणाली उपलब्ध करून देणार आहोत. धारावीतील बरे झालेल्या काही रुग्णांची पुढच्या पाच दिवसात तपासणी करणार आहोत. त्यातील प्लाझ्मा दान करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम अशांकडून शिबीरात प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. त्यासाठी हे शिबीर देशात एक वेगळा उपक्रम ठरेल. मोठा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढविण्यावरही भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसीस यांना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती देण्यात आली. जिथे रुग्ण आढळून येतात, तेथे एकत्रित जाऊन डासांची उत्पुत्ती रोखण्यासाठी उपाय योजनांवर भर देण्यात येत असल्याची तसेच 224 प्रभागात फवारणी सुरु आहे. टाक्यांच्या निर्जंतुकीकरणावर भर देण्यात येत आहे. बैठकीत कोरोना प्रतिबंधाबाबत झोपडपट्टी आणि सोसायटयांच्या क्षेत्रातील परिस्थिती आणि उपाय योजनांची माहिती वॉर्डनिहाय सादर करण्यात आली. 

( संकलन - सुमित बागुल )

cm uddhav thackeray warns citizens and reminds to be alert while corona is not fully gone


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com