Raju Patil
Raju Patil Sakal
मुंबई

शिंदे- राज ठाकरे एकत्र? मनसे आमदाराचं सूचक विधान

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कॉल केला आणि त्याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात नव्याने रंगू लागली आहे. यावरुन मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी जवळीक होऊ शकते, परंतू सर्वस्वी निर्णय हा राज ठाकरे यांचाच असल्याचे सूचक विधान केले आहे. मनसे भाजपच्या युतीनंतर आता मनसे व शिंदे गट युती होते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याचे पडसाद स्थानिक पातळीवर देखील उमटण्याची शक्यता असल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगला आहे. शिंदे हे आपला गट एखाद्या राजकीय पक्षात विलीन करतील अशी चर्चा आहे. त्यातच मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. यावेळी त्यांच्यात राजकीय चर्चा देखील झाल्याचे बोलले जात आहे. याविषयी मनसेचे एकमेव आमदार व विधानसभा निवडणूकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

राजू पाटील सध्या बाहेर आहेत. मात्र त्यांनी याविषयी बोलताना सांगितले, गेल्या दोन दिवसांपासून मी राज साहेबांच्या संपर्कात नाही. प्रसार माध्यमांच्या मार्फतच मला हे समजले आहे की राज साहेब यांना एकनाथ शिंदे यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. त्यांचे पहिल्यापासून एकमेकांशी चांगले संबंध आहेत. मध्ये काही नेतृत्वाच्या अडचणी असतील त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला होता. यावेळी त्यांनी एक कॉल केला असेल. सध्या जे राजकारण सुरु आहे, ते पाहता शिवसेना आणि महाविकास आघाडीचा हा अंतर्गत वाद आहे.

त्यामुळे या घडीला आम्हाला त्याच्यात काही रस नाही. शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला याला अनेक कारणे आहेत. परंतू त्यातील एक कारण म्हणजे त्यांनी सांगितलेला हिंदूत्वाचा मुद्दा. जो मुद्दा आम्ही राज साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे घेऊन जात आहोत. हे काही कॉमन मुद्दे आहेत, त्या अनुषंगाने जवळीक होऊ सुद्धा शकते. परंतु सर्वस्वी निर्णय हा राज साहेबांचा असून त्यावर मी काही भाष्य करु इच्छित नाही असे पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT