jitendra awhad and anand paranjape
jitendra awhad and anand paranjape sakal
मुंबई

Anand Paranjape : आव्हाडांना मतदारसंघातील मतदार फार सिरियसली घेत नाहीत

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव, पक्षाचे घड्याळ हे चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. यामुळे आव्हाड यांना अजित पवार यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल करीत, कळवा विधानसभा मतदारसंघात पण मतदार त्यांना फार सिरियसली घेत नसल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला.

ज्या सनातन संस्थेवर बंदी आणा आणि ज्या सनातन संस्थेबद्दल कायम आव्हाड बोलत असतात त्या संस्थेच्या कार्यक्रमाला ते गेले होते आणि जिथे प्रभू श्रीरामाचे कथा होती तिथे त्यांनी तुतारी वादन केले! रायगडावर त्यांनीखरीच तुतारी वाजवली की खोटी तुतारी वाजवली मला माहित नाही.

पण ज्या कार्यक्रमात सामाजिक आणि धार्मिक व्यासपीठ होते त्या कार्यक्रमांमध्ये जाऊन त्यांनी तुतारी वाजवली. त्यांनी जर तिथे जाऊन बोलण्याची हिम्मत, धारिष्ट दाखवले असते की  प्रभू श्रीराम मांसाहारी होते ! मग यावर तिथून काय प्रतिक्रिया रामभक्तांकडून आली असती? कळव्याच्या मतदारसंघांमधून... ते त्यांना अधिक चांगल्या प्रकारे माहित पडले असते.

तसेच जितेंद्र आव्हाड यांना भीती वाटतेय. की त्यांच्या बाजूने जे कोण थोडेसे राहिलेले आहेत त्यांचाही ओढा अजित पवार यांच्या दिशेने जाईल. यामुळेच ते वाटेल ते बोलत सुटलेत. आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या केसेस, किडनॅपिंगच्या केसेस, ३०७ ची केस, अशावेळी आव्हाड हे कुठल्या नैतीकतेचे उपदेश देतात? आम्हीही यावर बोलायचे का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांचे भर अधिवेशनात धिंडवडे काढले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. अजित पवार  हे आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. आम्हाला पक्षाचे नाव, चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. तसेच महायुतीचे ४५ प्लस उमेदवार विजयी होतील असा विश्वास देखील आनंद परांजपे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे ज्या निवडणुकीत महायुतीमध्ये लढू. जिथे तिथे लोकसभेला घड्याळ चिन्ह घेऊन आमचे उमेदवार असतील तिथे आम्ही घड्याळाचा प्रचार करू.

जास्तीत जास्त मतांनी आमचे लोकसभेचे उमेदवार जिंकतील. भाजपचे केंद्रीय शिर्ष नेतृत्व, शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीचे नेते चर्चेला एकत्र बसतील तेव्हा महायुतीचा फॉर्मुला जाहीर होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT