मुंबई

भरोसा कक्षात 22 पीडितांना न्याय; सहा महिन्यांत तडजोडीद्वारे वाद मिटले 

प्रमाेद जाधव

अलिबाग : ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार, अन्याय रोखण्यासाठी रायगड जिल्हा पोलिस दलाने "भरोसा कक्ष' तयार केले आहे. याद्वारे गेल्या सहा महिन्यांत 45 जणांनी तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी सुमारे 50 टक्के म्हणजे 22 महिलांना तडजोडीद्वारे न्याय मिळाला आहे. हा कक्ष मार्चपासून सुरू झाला आहे. 

धक्कादायक : चोरीसाठी आला अन्‌ जखमी झाला
 
भरोसा कक्षात अनेक पीडित मोठ्या विश्‍वासाने धाव घेत आहेत. याद्वारे पोलिस मदत, महिला हेल्पलाईन, वैद्यकीय सेवा, विधीविषयक सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भरोसा सेलमध्ये सहाय्यक निरीक्षक दर्जाचा अधिकारी असून त्यांच्यासोबत एक उपनिरीक्षक, दोन पोलिस हवालदार आणि दोन पोलिस नाईक यांचा समावेश आहे.  

रायगड जिल्ह्यासाठी अलिबाग येथे हा कक्ष असून मार्च ते सप्टेंबरदरम्यान 45 तक्रारी दाखल झाल्या. त्यात एक अर्ज ज्येष्ठ नागरिकांकडून, तर 44 अर्ज महिलांवरील अत्याचाराबाबत दाखल होत्या. त्यापैकी 22 तक्रारींचे निराकरण तडजोडीद्वारे करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. उर्वरित 22 तक्रारी प्रलंबित आहेत, तर एक तक्रार समुपदेशनानंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कक्षाच्या वतीने देण्यात आली. 


भरोसा कक्षाद्वारे प्रकरणे तातडीने सोडविण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत निम्मी प्रकरणे सोडवून पीडितांना न्याय देण्यात आला आहे; तर उर्वरित प्रकरणे लवकरच सोडवली जातील. 
- संगीता बोचरे-पाटील, पोलिस उपनिरीक्षक, भरोसा कक्ष. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT