esakal | चोरीसाठी आला अन पत्र्यावरून खाली कोसळून जबर जखमी झाला; तिघांना अटक, जखमी रुग्णालयात
sakal

बोलून बातमी शोधा

चोरीसाठी आला अन पत्र्यावरून खाली कोसळून जबर जखमी झाला; तिघांना अटक, जखमी रुग्णालयात

एक चोर इन्व्हर्टरची अवजड बॅटरी चोरून नेत असतांना पत्रा तुटून बॅटरीसह तो खाली कोसळला आणि जबर जखमी झाला आहे. पाली पोलिसांनी यातील 3 चोरांना पकडून अटक केली

चोरीसाठी आला अन पत्र्यावरून खाली कोसळून जबर जखमी झाला; तिघांना अटक, जखमी रुग्णालयात

sakal_logo
By
अमित गवळे

पाली - सुधागड तालुक्यातील मढाळी गावाजवळील एका बंद बंगल्यात चोरी करण्यासाठी 4 चोर घुसले होते. आणि यातील एक चोर इन्व्हर्टरची अवजड बॅटरी चोरून नेत असतांना पत्रा तुटून बॅटरीसह तो खाली कोसळला आणि जबर जखमी झाला आहे. पाली पोलिसांनी यातील 3 चोरांना पकडून अटक केली असून जखमी चोर उपचार घेत आहे.

यशवंत जाधवांची हॅट्रिक, देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच

या बाक्या प्रसंगातही चोरांनी डाव साधला आणि याही अवस्थेत हाताला मिळालेला टीव्ही, 2 फॅन आणि 2 लोखंडी पाईप पळवून नेले. ही घटना 26 सप्टेंबरला रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. आणि शनिवारी (ता.3) पाली पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला. तर सोमवारी (ता.4) पाली कोर्टाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. या चोरीत मिथुन भोईर (वय 30), दिनेश जाधव (वय 26), लक्ष्मण वाघमारे (वय 33) आणि विजय हिलम सर्व सर्व राहणार मढाळी आदिवासीवाडी, तालुका सुधागड. यातील विजय हिलम हा जखमी असून इतर तिघे अटकेत आहेत.

डायबिटीसग्रस्तांची चिंता मिटणार, 'डायबेटिक फूट अल्‍सर'वर वोक्‍सहिल ठरतंय गुणकारी

या चोरांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर खिडकीचे ग्रील वाकवून काच फोडून प्रवेश केला. त्याआधी कोयत्याने बंगल्याभोवती असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. या बरोबरच चोरांनी प्लास्टिक पाईप व इन्व्हर्टरची बॅटरी फोडून नुकसान केले आहे. हे चारही चोर कॅमेऱ्यात दिसले आहेत. हा बंगला संगीता शरद अरुळेकर रा. नेरुळ यांचा आहे. तर या बंगल्याची देखरेख पालीतील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते कपिल पाटील यांच्याकडे आहे. या आधी देखील या बंगल्यात चोरीचे प्रकार झाले आहेत असे कपिल पाटील यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम. डी. बहाडकर करत आहेत. 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )