esakal | डायबिटीसग्रस्तांची चिंता मिटणार, 'डायबेटिक फूट अल्‍सर'वर वोक्‍सहिल ठरतंय गुणकारी
sakal

बोलून बातमी शोधा

डायबिटीसग्रस्तांची चिंता मिटणार, 'डायबेटिक फूट अल्‍सर'वर वोक्‍सहिल ठरतंय गुणकारी

पाय विच्छेदन करण्यापासून वाचण्यासाठी वोक्‍सहिल औषध ठरणार गूणकारी 

डायबिटीसग्रस्तांची चिंता मिटणार, 'डायबेटिक फूट अल्‍सर'वर वोक्‍सहिल ठरतंय गुणकारी

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई - सेंटॉर फार्मास्‍युटिकल्‍सतर्फे डायबेटिक फूट अल्‍सरच्‍या उपचारासाठी पहिल्‍यांदाच जगातील पहिली न्‍यू केमिकल एण्टिटी (एनसीई) 'वोक्‍सहिल®' हे औषध तयार केले आहे. मधुमेहाने पीडित 25 टक्‍के व्‍यक्‍तींना डायबेटिक फूट अल्‍सरचा त्रास होतो. तर, गंभीर संसर्ग झालेल्‍या 5 पैकी एका व्‍यक्‍तीचे पाय विच्‍छेदन करावे लागते. वोक्‍सहिलमुळे भारत आणि जगभरात लाखो व्‍यक्‍तींचे होणारे पाय विच्‍छेदन टाळण्‍यामध्‍ये मदत होणार आहे. 

10 वर्षांत 10 कोटी भारतीयांना मधुमेहाचा त्रास -

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, पुढील 10 वर्षांमध्‍ये 10 कोटी भारतीयांना मधुमेह होण्‍याचा धोका आहे. मधुमेहांच्‍या इतर आजारांमध्‍ये डायबेटिक फूट अल्‍सर हा भारतामध्‍ये सर्वाधिक आढळून येणारा आजार आहे. डायबेटिक फूट अल्‍सर्स हा उपचार न होऊ शकणारा आजार आहे. सोबतच रूग्‍णाला ओले गँग्रिन, सेल्युलायटिस, गळू आणि नेक्रोटाइझिंग फॅसिआइटिस यासारखे आजार होण्‍याची शक्‍यता आहे. ज्‍यामुळे पूर्णत: किंवा अंशत: पाय विच्‍छेदन करावे लागेल. अहवालानुसार , मधुमेहाने पीडित 25 टक्‍के व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या जीवनामध्‍ये डायबेटिक फूट अल्‍सर होण्‍याचा धोका आहे. पायाला गंभीर संसर्ग झाल्‍यामुळे हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍यात आलेल्‍या 5 पैकी एका मधुमेही रूग्‍णाचे पाय विच्‍छेदन करावे लागते. 

सेंटॉर फार्मास्‍युटिकल्‍सचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. एस. डी. सावंत म्‍हणाले, "पाय विच्‍छेदनांच्‍या प्रमाणाबाबत असलेल्या चिंतेतून या गोष्‍टीला प्रतिबंध करणारे औषध विकसित करण्‍याची इच्‍छा होती. पंधरा वर्षांपूर्वी आम्‍ही जर्मनीतील सायटोटूल्‍स एजीसोबत सहयोग केला. त्‍यांच्‍याकडे डायबेटिक फूट अल्‍सरच्‍या उपचारासाठी ही आशादायी उपचारपद्धत होती. 

महत्त्वाची बातमी : संजय राऊत आणि कुणाल कामरा यांची भेट, सोशल मीडियावर फोटो शेअर

काय आहे वोक्‍सहिल® ?

जागतिक स्‍तरावरील पेटंटेड उत्‍पादन 'वोक्‍सहिल®' टॉपिकल सोल्‍यूशन डायबेटिक फूट अल्‍सरचा उपचार करण्‍यामध्‍ये गुणकारी आहे. 'वोक्‍सहिल®' मध्‍ये एनसीई, डायपरोक्‍सोक्‍लोरिक अॅसिड आहे, ज्‍याला डीपीओसीएल असे म्‍हणतात. 'वोक्‍सहिल®'मध्‍ये कार्य करण्‍याची दुहेरी यंत्रणा आहे. म्‍हणजेच ते ग्रॅम पॉझिटिव्‍ह व ग्रॅम निगेटिव्‍हविरोधात अॅण्‍टीबॅक्‍टेरिअल म्‍हणून कार्य करते आणि फायब्रोब्‍लास्‍ट पेशींच्‍या वाढीसाठी देखील मदत करते. ज्‍यामुळे जखमा पूर्णपणे ब-या होण्‍यामध्‍ये मदत होते. 

90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांसाठी गूणकारी-

भारतभरात 15 हून अधिक वैद्यकीय चाचणी केंद्रांमध्‍ये 'वोक्‍सहिल®'वर करण्‍यात आलेल्‍या यादृच्छिक वैद्यकीय चाचण्‍यांमधून स्‍पष्‍ट झाले की, उपचार होऊ न शकणा-या डायबेटिक फूट अल्‍सरने पीडित 90 टक्‍क्‍यांहून अधिक रूग्‍णांमध्‍ये अल्‍सरच्‍या आकारात घट झालेली दिसली. आणि यापैकी 75 टक्‍के रूग्‍ण कोणत्‍याही सुरक्षितता उतींशिवाय 6 ते 8 आठवड्यांमध्‍ये पूर्णपणे बरे झाले. अहवाल आणि चाचणीच्‍या निष्‍पत्ती भारतीय नियामक प्राधिकरणाकडे सादर करण्‍यात आले आणि सेंटॉर फार्मास्‍युटिकलला 'वोक्‍सहिल®'साठी उत्‍पादन व आणि विपणन मान्‍यता मंजूर करण्‍यात आली. 

वोक्‍सहिल® भारतात तिस-या टप्‍प्‍यातील वैद्यकीय चाचण्‍या पूर्ण केल्‍या आहेत. या चाचण्‍यांमधून हे उत्‍पादन उपचार करता येऊ न शकणा-या डायबेटिक फूट अल्‍सर्सने पीडित रूग्‍णांच्‍या जखमांवर त्‍वरित व गुणकारी उपचार होण्‍यामध्‍ये साह्यभूत असल्‍याचे दिसून आले.

- डॉ. मार्क -अँड्रे फ्रेबर्ग , वोक्‍सहिल®'चे सह-नवप्रवर्तक 
 

महत्त्वाची बातमी : उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह अखेर सापडला

वोक्‍सहिल®' हे भारतीय-जर्मन सहयोगामधून विकसित करण्‍यात आलेले नोव्‍हेल औषध आहे. हे औषध डायबेटिक फूट अल्‍सरच्या केल्या जाणा-या व्‍यवस्‍थापनामध्‍ये बदल घडवून आणेल आणि विच्‍छेदनाला प्रतिबंध करण्‍यामध्‍ये मदत करेल. असं जर्मनीमधील सायटोटूल्‍स एजीचे मुख्‍य वैज्ञानिक अधिकारी डॉ. डर्क म्हणतायत. 


now treatment on diabetic foot ulcer will save patients foot read full news