मुंबई

मुंबई महापालिकेची कारवाई अवैध, मला दोन कोटींची नुकसान भरपाई द्या - कंगना

- सुनीता महामुणकर

मुंबई : बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवून तोडक कारवाई करणाऱ्या मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगना राणावतने दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. महापालिकेची कारवाई अवैध आहे, असे कंगनाने याचिकेत म्हटले आहे.

कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयात अवैध बांधकाम असल्याचा आरोप महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. त्यावर चोवीस तासात उत्तर देण्याचे आदेश ही पालिकेने दिले होते. मात्र तीने दिलेला खुलासा अमान्य करून पालिकेने पाडकाम केले आहे. याविरोधात तीने एड रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेत आता सिद्दीकी यांनी नवीन मुद्दे आणि मागणी नमूद केले असून सोमवारी रात्री सुधारित याचिका दाखल केली.

महापालिकेच्या अधिकार्यांनी विनापरवानगी घरामध्ये घुसखोरी केली, कारवाईच्या नावाखाली जाणीवपूर्वक तेथील झुंबर, सोफा आणि अन्य महत्त्वाचे दुर्मिळ सामानाची अवैधपणे तोडफोड केली आहे, बंगल्यातील सुमारे चाळीस टक्के बांधकाम तोडलेले आहे, त्यामुळे भरपाई म्हणून महापालिकेने दोन कोटी रुपये द्यावे अशी मागणी याचिकेत केली आहे. 

कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य काम बंगल्यात सुरू नव्हते, तसेच न्यायालयात याचिका केली आहे, असे सांगूनही कारवाई थांबविण्यात आली नाही, असाही दावा केला आहे. सुमारे 92 पानी याचिकेत महापालिकेच्या एच डब्ल्यू प्रभाग अधिकार्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय हेतूने ही कारवाई असून पुरेसा वेळही देण्यात आला नाही, असा आरोप केला आहे.

उच्च न्यायालयाने तूर्तास कारवाईला स्थगिती दिली आहे. तसेच याचिकेवर पालिकेला ता. 18 पर्यंत खुलासा करण्याचा अवधी दिला आहे. याचिकेवर अंतिम सुनावणी ता. 22 रोजी होणार आहे. वांद्रे येथील पाली हिलच्या बंगल्यात टॉयलेटच्या जागी कार्यालय, जिन्याच्याखाली टॉयलेट, पूजा खोलीत पार्टिशन इ. नियमबाह्य काम केल्याचा दावा महापालिकेच्या नोटीसीमध्ये आहे.

( संपादन - सुमित बागुल ) 

kangana ranaut demands two crore as compensation for the action taken by BMC

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aamir Khan Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खानची पहिली प्रतिक्रिया; '3 इडियट्स'मधील रँचोबाबत केला मोठा खुलासा

Petrol-Diesel Price: १७ जुलैला इंधनाचे ताजे दर जाहीर! कच्चे तेल १२ टक्क्याने महागल्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल कितीला?

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Pune Crime : कोथरूड हल्ला प्रकरणातील घायवळ टोळीच्या गुंडाला मुंबईतून अटक, व्यावसायिकावर कोयत्याने केले होते वार

Tukaram Mundhe : फरक पडतो... फक्त 'तुकाराम' लागतात! FDA आयुक्त मुंढेंचा राज्यभरात धडाका; गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाचे धाबे दणाणले, आता पुढचा नंबर कोणाचा?

SCROLL FOR NEXT