"....नाहीतर संपूर्ण मुंबईत तीव्र आंदोलन छेडणार, मला अटक झाली तरी चालेल" - प्रवीण दरेकर

"....नाहीतर संपूर्ण मुंबईत तीव्र आंदोलन  छेडणार, मला अटक झाली तरी चालेल" - प्रवीण दरेकर

"#JusticeForAnkush, सायन हॉस्पिटलच्या लापरवाहीमुळे २८ वर्षीय युवकाला आपला जीव गमवावा लागला. सायन हॉस्पिटलच्या गलिच्छ कारभाराचा निषेध." असे फलक हातात घेत भाजपकडून आज सायन हॉस्पिटल बाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं. मृतदेह अदलाबदल प्रकरणी सायन रुग्णालयाबाहेर आज भारतीय जनता पक्षातर्फे तर्फे तीव्र छेडण्यात आलं. भाजपने कडक आंदोलन करत सायन रुग्णालयाबाहेर ठिय्या मांडला. भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत भाजपचे अन्य नेतेही या आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रकरणात बड्या अधिकाऱ्यांना घरी पाठवा अशी मागणी भाजप कडून केली जातेय. 

आज सकाळी दहा वाजेपासून खरंतर रस्त्याच्या बाजूला हे धरणं आंदोलन सुरु होतं. मात्र दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांकडून सायन रुग्णालयासमोरचा मुख्य रास्ता अडवण्यात आला आणि सर्व कार्यकर्ते मुख्य रस्त्यावर आंदोलनाला बसलेले पाहायला मिळाले. यामध्ये आमदार सेल्वम, मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबकर, यासोबत प्रवीण दरेकर यांचा समावेश होता. सरकारकडून याबाबत ठोस निर्णय घेतला जात नसल्याने भाजपने आपलं आंदोलन अधिक तीव्र केलंय. मला अटक केली तरी चालेल, मात्र जोवर या प्रकरणात न्याय होत नाही तोवर इथून हटणार नाही अशी भूमिका प्रवीण दरेकरांनी घेतली. दरम्यान मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल जोवर इथे येत नाहीत तोवर आंदोलन संपवणार नसल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलं.

या आंदोलनाला गालबोळ लागू नये म्हणून आंदोलनस्थळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून SRPF ची अधिकची टीम देखील आंदोलनस्थळी बोलवण्यात आलेली. 

कर्मचाऱ्यांना निलंबित करून लोकांचं समाधान करणार आहेत का ? थातुर-मातुर कारवाई न करता याप्रकरणी मोठे अधिकारी निलंबित झाले पाहिजेत. अंकुशला न्याय मिळाला पाहिजे. प्रशासनाने इथे यावं. आमच्याशी आमच्या चर्चा करावी, आमच्या तक्रारी जाणून घेणं त्याचा निस्तार करावा अन्यथा संपूर्ण मुंबई शहरभर भाजपकडून उग्र आंदोलन केलं जाईल असं विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.

दरम्यान, तीव्र आंदोलनानंतर मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि सायन रुग्णालयाचे अधिष्टाता मोहन जोशी यांनी प्रवीण दरेकरांची भेट घेतलीये आणि आता आंदोलन स्थगित करण्यात आलंय. उद्या संध्याकाळी ५ वाजता मुंबई महापालिका इकबालसिंह चहल यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. यामध्ये अंकुशच्या कुटुंबियांना मदत मिळाली नाही तर पुन्हा आंदोलनाला सुरवात करू असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. दरम्यान हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय, मागे घेण्यात आलेलं नाही असंही प्रवीण दरेकरांनी म्हटलंय.    

vidhan parishad opposition leader demands Justice For Ankush agitation against sion hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com