छम छम बारबाला झाल्यात बिझनेस वूमन, 'अशी' शक्कल लढवून भरतायत पोटाची खळगी

छम छम बारबाला झाल्यात बिझनेस वूमन, 'अशी' शक्कल लढवून भरतायत पोटाची खळगी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील बार बालांना जबरदस्त फटका बसला आहे. 22 मार्च पासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईसह भारतात सर्वच व्यसवसाय उद्योग आणि कामकाज बंद पडलंय. तसेच मुंबईमधील डान्सबार देखील बंद झाले आहेत. या डान्स बारमध्ये डान्स करणाऱ्या जवळपास 70 हजार मुली आता बेरोजगार झाल्यात. 

लॉकडाऊन सतत वाढत गेल्याने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. सुरुवातीला या बार बालांना काही ग्राहकांनी पोसले, रेशन आणि जीवनावश्यक वस्तू पुरवल्या. मात्र हळूहळू लॉकडाऊन वाढत गेला. ग्राहकांनाही आर्थिक चणचण वाढू लागली आणि त्यांनीही आपला मदतीचा हात मागे घेतला. 

अशातही काहींनी उसने पैसे घेऊन जीवन सुरू ठेवलंय. तर काहींना बार मालकांनी काही शुल्लक मदत केलीये. मात्र तरीही बार डान्सर्सना  रोजच्या दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावाच लागतोय. काही हताश होऊन  बसल्या. तर काहींनी घरातच देहव्यापार सुरू केला. तर काहींनी या लॉकडाऊनचा उपयोग व्यवसाय करण्यासाठी केला. 

रेणू हीने भाजी आणि फळ विकण्याचा धंदा सुरू केला आणि गेल्या 5 महिन्यापासून ती त्यातून चांगलं उत्पन्न मिळवत आहे. तसेच तिच्या घराचं भाडं, विजेचं बिल आणि इतरखर्च  ती भाजी विकून मिळणाऱ्या उत्पन्नातून नियमित भरतेय.

तसेच प्रिया हिने किराणा माल आणि चहाचं दुकान सुरू केलं आहे. त्यातून तिचा उदरनिर्वाह होतोय. मालवणीत जवळ जवळ दोन ते तीन हजार बार बाला वास्तव्य करतात. यामधून अधिकतर बार उघडण्याची प्रतीक्षा करत आहेत. डान्सबार बंद झाल्याने यात काम करणारे वेटर, आचारी, सिक्युरिटी गार्ड, आणि बारवर निर्भर असलेले व्यवसायी भाजी विक्रेता, धान्य विक्रेते, मद्य विक्रेते, तसेच पान विडीचे दुकानदार, रिक्षा, टॅक्सीवाले, यांनाही डान्स बार बंद असल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच या बार बालांसाठी विशेष कपडे शिवणारे व विकणारे दर्जी आणि दुकानदार यांना मोठा फटका बसला आहे.

काही बार बालांना सामाजिक संस्थांनी  अन्न धान्य आणि जीववश्यक वस्तू पुरवल्या. या बार बालांमध्ये अधिकतर बार बाला या निरक्षर आणि कमी शिक्षण झालेल्या असल्याने पोटासाठी डान्स किंवा देह व्यापार यापलीकडे त्या विचार करत नाहीत. मात्र यातूनही काही महिलांनी लॉकडाऊनला संधी म्हणून उपयोग करत भाजी आई फळं विकणे तसेच चहा, किरणाचे दुकान सुरू केले आहे.

( संकलन - सुमित बागुल )

bar dancer starts their own business starts vegetable and fruit mart few started tea stalls 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com