मुंबई

दोन किलो चरससह काश्मिरी तरूणाला अटक

सकाळवृत्तसेवा

मुंबई : दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातील शीळ फाटारोड येथे केलेल्या कारवाईत चरससह एका काश्मिरी तरूणाला अटक केली. त्याच्याकडून सुमारे दोन किलो चरस हस्तगत करण्यात आला आहे.

एक काश्मिरी तरूण अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसने सोमवारी शिळफाटा रोड येथे सापळा रचला. त्यावेळी मोटरसायकलवरून एक संशयित तरुण तेथे आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक किलो 800 ग्रॅम चरस सापडले. आरोपीच्या चौकशीत तो जम्मू काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यातील पाहेलगाम तहशीलमधील रहिवासी असल्याचे समोर आले. त्यानुसार अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीला ठाण्यातील न्यायालयापुढे हजर केले असता त्याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या विक्रीचे पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येत होते का, याबाबत एटीएस तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबला पहिला धक्का, चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या ग्लिसनला मिळाली पहिली विकेट

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT