कामाेठे येथील भुयारी मार्गाची दुरवस्‍था
कामाेठे येथील भुयारी मार्गाची दुरवस्‍था 
मुंबई

खारघर,कामोठे भुयारी मार्ग लवकरच

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कामोठे आणि खारघर हिरानंदानी उड्डाणपुलाखालील प्रलंबित भुयारी मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू असून पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली. 

शीव- पनवेल महामार्गावरील कामोठे आणि खारघर येथील पादचाऱ्यांना महामार्ग ओलांडता यावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने भुयारी मार्ग उभारण्याचे काम हाती घेतले होते; मात्र काही कारणास्तव हे काम अपूर्णच राहिले. नुकतेच खारघरमधील शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रकांत देवरे यांनी खारघर येथील भुयारी मार्ग आणि हिरानंदानी पुलाखाली बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन दिले होते. 
भुयारी मार्गात तुंबलेल्या पाण्यामुळे डासांमुळे वाहतूक पोलिसांनाही त्रास होत असल्याचे वाहतूक विभागाने पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले होते. 

नागरिकांचा वाढता दबाव लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने भुयारी मार्ग विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून पावसाळ्यानंतर या दोन्ही भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PN Patil Death: झुंज अपयशी! करवीरचे आमदार पी.एन पाटील यांचे निधन

Prashant Kishore: आवाज कमी करा... 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर संतापले, व्हायरल व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं?

General Tax : सामान्य करात महिलांना ३० टक्के सवलत; महापालिका आयुक्त सिंह यांची माहिती

Katraj Navale Bridge Road : कात्रज-नवले पूल रस्ता होणार तरी कधी? संथ कामामुळे नागरिक त्रस्त

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

SCROLL FOR NEXT