१०० ते १५० रुपयांना होतेय किवीची खरेदी
१०० ते १५० रुपयांना होतेय किवीची खरेदी 
मुंबई

डेंगीमुळे किवीविक्री जोरात

सकाळ वृत्तसेवा

महाड (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये डेंगी व डेंगीसदृश तापांचे रुग्ण वाढत आहेत. या आजारात कमी होत असलेले रक्तातील प्लेटलेट्‌स वाढवण्यासाठी किवी फळ उपयुक्त ठरत असल्याने जिल्ह्यात आता किवीची मागणी वाढत चालली आहे. फळांमध्ये फारसे परिचित नसलेले फळ आता प्रत्येकाच्या तोंडी दिसत आहे.

हवामानामध्ये होत असलेल्या बदलांमुळे डासांचा प्रादुर्भाव अनेक शहरांत वाढत आहे. यामुळे तापांचे रुग्णही वाढत चालले आहेत. याशिवाय, जिल्ह्यात डेंगी व डेंगीसदृश तापांचेही रुग्ण वाढत आहेत. महाडमध्ये तर डेंगी तापामुळे राजकीय वातावरणही तापले आहे. डेंगी व इतर तापांमध्ये रक्तातील प्लेटलेट्‌स कमी झाल्याने अनेकदा रुग्णांना ॲडमिट करावे लागते. अशा वेळी रुग्ण किवी फळ खाण्याकडे वळतात. सध्या अनेकांनी डेंगीची धास्ती घेतल्याने किवी विक्रेत्यांचे फावले आहे. डेंगी झाल्यावर रक्तातील प्लेटलेट्‌सची संख्या कमी होते. किवी, ड्रॅगन फ्रूट ही फळे, तसेच पपईच्या पानांचा रस घेतल्याने प्लेटलेट्‌सची संख्या एकदम वाढते, अशा आशयाचे संदेश समाज माध्यमांवर व्हायरल होत असतात. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही तरीही या संदेशांमुळे एरवी कुणीही खात नसलेली ही फळे १०० ते १५० रुपयांना विकत घेतली जातात. बाहेरून हिरवट, चॉकलेटी रंगाचे असलेले हे चीनचे राष्ट्रीय फळ आहे. भारतात चिनी कृषिमालावर बंदी असल्याने चिली व न्यूझीलंडमधून किवीचे बॉक्‍स विक्रीला येतात.

वैशिष्ट्ये..
किवीच्या एका फळामध्ये ६१ कॅलरी असतात. त्यात ०.५ ग्रॅम स्निग्धपदार्थ, १.१ ग्रॅम प्रथिने, १५ ग्रॅम पिष्टमय पदार्थ असतात. इतर फळांपेक्षा थोडे जास्त प्रमाणात क जीवनसत्त्व असते. त्याशिवाय किवीमध्ये अ, इ आणि के ही जीवनसत्त्वे आणि फोलेट्‌स असतात. सोडियम, पोटॅशियम, क्‍लोराइड हे क्षार, तसेच कोलिन, मॅग्नेशियम, लोह, मॅंगेनिज, फॉस्फरस ही खनिजे काही प्रमाणात असतात. मात्र, हे घटक जवळपास सर्व फळांमध्ये कमी अधिक प्रमाणात आहेत.

जिल्ह्यातील किवीची विक्री
चार फळांचा बॉक्‍स    १०० रुपये 
सहा लहान फळे     १०० रुपये 
२०१९ वर्षात .... एक ते दीड टन

मागील वर्षापूर्वी .... अर्धा टन

किवी खाल्ल्यावर प्लेटलेट्‌स वाढतात, याबद्दल प्रमाणित पद्धतीचे कुठलेही शास्त्रीय संशोधन नाही. तरीही डेंगीच्या भीतीने अनेक जण किवीचा खुराक सुरू करत आहेत. त्यामुळे या फळाला व विक्रेत्यांना सध्या रायगडात सुगीचे दिवस आले आहेत. किवीला पूर्वीपेक्षा आता चांगली मागणी आहे. दिवसाला दोन ते तीन बॉक्‍स विकले जात; परंतु आता पूर्ण क्रेट होतोहात संपत आहेत. 
- अब्दुल शेख, फळविक्रेता

सर्व फळे ही शरिरासाठी उपयुक्त असतात; परंतु त्यांनी आजार बरे होतात, असे नाही. औषधांचा वापर आणि रक्ताच्या तपासण्या डॉक्‍टरांच्या सल्ल्याने करत राहावे. मुख्य म्हणजे, समाज माध्यमांपेक्षा डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. डेंगीचा आजार असताना रुग्णांनी पूर्ण विश्रांती घ्यावी. आपला नेहमीचाच आहार दिवसातून तीन वेळा घेत राहावे, ३-४ लिटर पाणी, सरबत, पेय या स्वरूपात द्रवपदार्थ घेत राहावे.
- डॉ. दिगंबर गीते
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT