Prasad Lad sakal
मुंबई

मुंबई : लाड यांच्या कन्येच्या विवाहास राजकीय नेत्यांची मांदियाळी

लाड यांनीही नृत्यावर ठेका धरला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपचे राज्य उपाध्यक्ष आणि विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांची कन्या चि. सौ. का. सायली व चि. शांतनू पोवळे यांच्या गोव्यात झालेल्या विवाहाप्रसंगी संजय राऊत, रामदास आठवले, नितीन सरदेसाई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आदी सर्वपक्षीय नेत्यांची तसेच अभिनेत्यांची मांदियाळी होती. यावेळी संगीत कार्यक्रमात खुद्द लाड यांनीही उडत्या गाण्यांवर ठेका धरला.

लाड यांचे जावई शांतनू पोवळे हे व्यवसायाने सनदी लेखापाल (सीए) असून त्यांची फर्म आहे. मात्र त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. गोवा येथे गुरुवारी (ता. 20) अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मात्र कोरोनाविषयक नियम पाळूनच हा विवाहसोहळा झाला. लेकीची पाठवणी करताना लाड यांनाही अश्रू आवरले नाहीत.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर, खासदार प्रितम मुंडे, मनोज कोटक, खासदार संजय राऊत, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, आमदार परिणय फुके, शर्मिला ठाकरे, मिलिंद नार्वेकर, नरेंद्र पाटील, कृपाशंकर सिंह, माजी खासदार निलेश राणे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार निरंजन डावखरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, अभिनेत्री निर्मिती सावंत आदी मान्यवर हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: आई, दार बंद करून माझ्यासोबत...; ६ वर्षांच्या चिमुकल्यासोबत विकृत कृत्य, संतापजनक घटनेनं खळबळ

विठ्ठलाशी काय आहे नातं? रिंकू राजगुरूच्या आयुष्यातील सर्वात हळवा भाग; आषाढी वारी निमित्त चाहत्यांना दिलं सरप्राईज

Latest Marathi News Live Update : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन विमानतळावर दाखल

Dodheshwar Road Row : दोधेश्वरात सात कोटींच्या अतिरिक्त रस्त्यावरून निधी उधळपट्टीचा आरोप; नैसर्गिक व धार्मिक वारसा धोक्यात?

IND vs ENG: ट्वेन्टी मालिका जिंकली आता वन डे! इंग्लंडने पहिल्या सामन्यासाठी जाहीर केली Playing XI

SCROLL FOR NEXT