petrol 
मुंबई

काय सांगता ! लॉकडाऊनमध्येही मोकाट वाहन चालकांची पेट्रोल पंपवर गर्दी

सकाळवृत्तसेवा

कर्जत : लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पेट्रोल दिले जात आहे. असे असतानाही विनाकारण भटकणाऱ्यांची संख्या कमी होत नसून मोकाट वाहनधारक कर्मचाऱ्यांना दमदाटी करून पेट्रोल पंपावर गर्दी करीत आहेत. त्यामुळे अशा पंपावर पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी पंप मालकांकडून होत आहे. 

गाडीत पेट्रोल टाकून मिळावे, म्हणून तरुणाई विविध शक्कल लढवत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला नाही तर पेट्रोल देण्यासाठी दबाव टाकला जात आहे. तर काही जण घरातील वृद्धांच्या मेडिकलच्या फाईल, भाजीपाल्यासाठी वापरली जाणारी कॅरेट गाडी मागे लावून शेतकरी असल्याचे भासवु पाहत आहेत. यामुळे पोलिस व पेट्रोलपंप चालकांची डोकेदुखी वाढली आहे.

काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते धान्य वाटपाची कारणे देत घालून गावोगावी अप्रत्यक्षरीत्या पक्षाचा प्रचार करताना आढळून येत आहे. जमावबंदी असतानाही जीवनाश्यक वस्तू वाटपाच्या नावाने काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे . यावर पोलिसानी कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य वर्गामधून होत आहे.

 in Lockdown crowd of drivers at petrol pumps

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

SCROLL FOR NEXT