
डोंबिवली: कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सर्वत्र चिंताजनक परिस्थिती आहे. अशातच गर्भधारणेसारख्या नाजूक स्थितीत या आजाराच्या धास्तीने गर्भवती स्त्रिया अधिक मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे.
मोठी बातमी : मुंबईच्या टोलनाक्यांवर वाहनांची पुन्हा तुफान गर्दी!
आईपासून बाळालाही कोरोनाचा संसर्ग शक्य असल्याचे " आयसीएमआर" या संस्थेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर बाळ व माता या दोघांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी दैनंदिन तपासणी व महिन्याला होणारी अल्ट्रासाऊंड तपासणी बंद करण्यात आली असून काही त्रास जाणवल्यावरच घराबाहेर पडण्याचा सल्ला आता स्त्रीरोगतज्ज्ञ देत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने गर्भवती स्त्रियांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे सांगितले आहे. खरं तर गर्भधारणेच्या कालावधीत महिलांनी तणावमुक्त आनंदी राहण्याचा सल्ला दिला जातो. पण सध्याच्या गंभीर परिस्थितीमुळे गर्भवती महिलांचा तणाव आणखी वाढला आहे. तसेच नवजात बालकांच्या मातेला देखील अनेक निर्बंधाखाली रहावे लागत आहे, सद्यस्थितीत भेटीगाठी, नातेवाईकांचे येणे जाणे यावर बंधने घालण्यात आली आहेत. दरम्यान ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून महिलांनी मानसिक तणाव घेऊन घाबरून जाऊ नये. पूर्वीच्या काळातही महिन्याला तपासण्या होत नव्हत्या. त्यामुळे फक्त स्वतःची योग्य काळजी महिलांनी घ्यावी अशा सूचना स्त्रीरोगतज्ज्ञ देत आहेत.
काय करावे?
महत्वाची बातमी : गजानन महाराजांविषयीच्या त्या दाव्याबद्दल आयुष मंत्रालय करणार अभ्यास!
कोरोनाच्या भितीमुळे बाहेर फिरता ही येत नाही. काही दिवसांनी मी एका बाळाची आई होईल. मात्र, त्यावेळी वेळेवर लवकर वाहन उपलब्ध होईल की नाही? अशा एक न अनेक प्रश्नांनी मनात धडकी भरते. - सुश्रुषा पाटील, डोंबिवली
सध्या ड्रायफ्रूटस, फळे व इतर आरोग्यदायी वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरोदर असल्याने इच्छा होईल ते पदार्थ बाहेर जाऊन खाता येत नाही त्यामुळे खूप वाईट वाटते. त्यामुळे अशा महत्त्वाच्या दिवसातही मानसिक तणावामधून जावे लागत आहे.
– अश्विनी जाधव, बदलापूर.
स्त्रियांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे आईला संसर्ग झाला तर गर्भालाही संसर्ग होण्याचा धोका असतो. फक्त गरज भासल्यास बाळाच्या वाढीसंदर्भात अत्यावश्यक असणारी तपासणी करण्याची विनंती आम्ही रेडिओलॉजिस्टला करत आहोत. रुटीन चेकअप व इतर तपासण्या तूर्तास बंद केल्या आहेत.
- डॉ. प्राजक्ता ठाकूर, स्त्रीरोगतज्ञ, कल्याण
Pregnant women should take care of themselves during Corona ... be stress free
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.