लॉकडाऊनमध्ये ग्राहकांची लूट, व्यापाऱ्यांकडून चढ्या दराने डाळींची विक्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 एप्रिल 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, या करिता खबदारीचा उपाय म्हणून अन्नधान्य मार्केट तसेच भाजीपाला मार्केट बंद ठेवण्यात आले होते. याच संधीचा फायदा घेत कर्जतमधील काही व्यापाऱ्यांनी डाळी, तेलाच्या किमतीत वाढ केली आहे. काही व्यापारी मालच मिळत नसल्याचे सांगून वाढीव दराने माल विकत आहेत. 

कर्जत : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, या करिता खबदारीचा उपाय म्हणून अन्नधान्य मार्केट तसेच भाजीपाला मार्केट बंद ठेवण्यात आले होते. याच संधीचा फायदा घेत कर्जतमधील काही व्यापाऱ्यांनी डाळी, तेलाच्या किमतीत वाढ केली आहे. काही व्यापारी मालच मिळत नसल्याचे सांगून वाढीव दराने माल विकत आहेत. 

हे ही वाचा एक्सपायरी डेट संपलेल्या मालाचं करायचं काय? व्यापारांसमोर मोठं संकट

व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्रीने लागली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी परिस्थितीचे भान ठेवून योग्य दरात धान्य विक्री करावी, अशी मागणी पोलीस मित्र संघटनेचे उप जिल्हाध्यक्ष दशरथ मुने यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस पाटील धनाजी मुने यांनी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे निवेदन दिले. सध्या भाज्यापाल्यांचे दर वाढविल्याने डाळ आणि कडधान्यवर भर दिला जात आहे. मात्र या संधीचा फायदा व्यापारी वर्गाने घेतल्याचे चित्र आहे.

नक्की वाचाठाणे जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; तुमच्या परिसराचा समावेश तर नाही ना?

व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून दुकानाबाहेर दराची पाटी लावण्यात यावी, अशी सूचना केली जाईल. तसेच वाढीव दराबाबत त्यांना योग्य सूचना करण्यात येतील. याबाबत पालन न केल्यास कार्यवाही केली जाईल.
- विक्रम देशमुख, तहसीलदार

 

 

Sale of pulses at high rates from shopkeepers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sale of pulses at high rates from shopkeepers