मुंबई

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 'मोठा' निर्णय, लॉकडाऊन दोन दिवस अधीच समाप्त...

प्रमोद जाधव

अलिबाग - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रायगड जिल्हयात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 26 जूलैच्या मध्यरात्रीपर्यंत  लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. परंतू कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या तसेच जिल्हयातील काही नागरिक आणि विविध संघटनाने लॉकडाऊन न करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. त्यांच्या या मागणीला दुजोरा देत जिल्हयातील लॉकडाऊन दोन दिवस अधिक समाप्त करण्यात आले. 24 जूलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन थांबविण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत.

लॉकडाऊन असतानाही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

जिल्हयातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून  जिल्हा प्रशासनाने 15 जूलै रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते 26 जूलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन घोषित केले होते. या कालावधीत पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. भाजी, मटण, मासळी विक्रीच्या दुकानांसह किराणा दुकानांनी बंदी घातली होती. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होऊ लागले होते.

प्रशासनाने गटारीच्या पार्श्वभुमीवर 18 जूलैपासून लॉकडाऊन शिथील केले होते. दुध, भाजी फळे, मासळी विक्रीसह किराणा दुकानांना सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली. त्यानंतर  गेल्या दोन दिवसापुर्वी दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली. जिल्हयात लॉकडाऊन असतानाही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली.

नागरिकांना आश्चर्याचा धक्का

जिल्हयातील काही नागरिक व विविध संघटनांनी लॉकडाऊनबाबत फेरविचार करावा अशी मागणी केली. जिल्हयात लॉकडाऊन असताना कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले नाही. तसेच संघटनेच्या मागणीचा विचार करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाऊन 24 जूलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन उठविण्याचे लेखी आदेश काढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाबाबत कौतूक होत असताना काही नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

( संपादन - सुमित बागुल ) 

lockdown in raigad district lifted 2 days in advanced read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT