लॉकडाऊनचा असाही होतोय गंभीर परिणाम, शरीरातील 'हे' व्हिटॅमिन होतंय कमी

लॉकडाऊनचा असाही होतोय गंभीर परिणाम, शरीरातील 'हे' व्हिटॅमिन होतंय कमी

मुंबई : कोरोना व्हायरस प्रतिबंध करण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये बहुतांश लोक घरांमध्ये बंद आहेत. यामुळे शरिरात. यामुळे शरीरात व्हिटॅमिन 'डी'ची कमतरता जाणवू लागली आहे. 'डी' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अस्थी,दात तसेच स्नायुं संबंधी तक्रारी वाढू लागल्या आहेत. देशातील लोकसंख्येपैकी सुमारे 70 ते 100 टक्के लोक ह्याने ग्रस्त असल्याचे सांगितले जाते.त्यामुळे डी व्हिटॅमिनची पूर्तता तसेच वेळेत योग्य उपचार कणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात.

शरीरातील 'डी' व्हिटॅमिनच वेगळं महत्व आहे.

कॅल्शियमचं शोषण नियंत्रित करणारे व्हिटॅमिन 'डी' हे एक अत्यंत महत्वाचे जीवनसत्व आहे तसेच हे पॅराथाँँयरायड ग्रंथीपासून हार्मोन्स मुक्त करण्यात मदत करते. सामान्यपणे मजबूत आणि निरोगी हाड, दात आणि स्नायूंसाठी व्हिटॅमिन-डी महत्त्वाचं मानलं जातं. याच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात. निरोगी आयुष्यासाठी हे व्हिटॅमिन आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असलं पाहिजे. याबाबत झेन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटलचे गुडघे प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ राकेश नायर यांनी माहिती दिली.

शरीरातील 'डी' व्हिटॅमिनची कमतरता औषध तसेच सेप्लिमेंटच्या माध्यमातून भरून काढता येते. मात्र त्याचे अतिसेवन झाल्यास ते शरीराला अपायकारक ठरू शकतं. व्हिटॅमिन 'डी' सप्लिमेंट आपल्यासाठी उपयुक्त असलं तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट्सचा वापर करावा स्वतःच्या मर्जीने कोणतीही औषधे घेऊ नका आणि डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त व्हिटॅमिनच डी चे सेवन करणेही भविष्यात धोकादायक ठरु शकते असा इशारा ही डॉक्टर नायर यांनी दिला आहे.

व्हिटॅमिन 'डी' हे आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्याला अनेक रोगांचा सामना करण्याची ताकद मिळते. त्यासोबतच आपली हाडेही मजबूत होतात. तसेच हृदयासंबंधीत अनेक आजारापासूनही तुम्ही मुक्त होऊ शकता. व्हिटॅमिन डी ची कमतरता नसल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणारच नाही, असे नाही. पण तो झाला तर व्हिटॅमिन डीची पातळी शरीरात नॉर्मल असल्यास विषाणूशी लढण्यास त्या व्यक्तीचे शरीर अधिक सक्षम असेल असे अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटलच्या आहारतज्ञ डॉ श्वेता सावंत यांनी सांगितले.

सूर्य हा ‘व्हिटॅमिन डी’चा मुख्य स्त्रोत मानला जातो. सकाळच्या कोवळ्या उन्हातून शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. कोवळी उन्हे अंगावर घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि संसर्गाचा धोका कमी होतो. व्हिटॅमिन डीसाठी तुम्ही आहारात मासे, अंडी, चीज, मशरुम, सोया मिल्क, दुधाचाही समावेश करा असे ही डॉ श्वेता सावंत यांनी सांगितले

( संपादन - सुमित बागुल )

due to lockdown vitamin D deficiency found in many people

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com