आणि तब्बल 25 वर्षानंतर 'त्या' स्वतःच्या पायावर पुन्हा चालू लागल्या...

आणि तब्बल 25 वर्षानंतर 'त्या' स्वतःच्या पायावर पुन्हा चालू लागल्या...

मुंबई - मुंबईत राहणाऱ्या 57 वर्षीय एक महिला तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर कोणाचाही आधार न घेता चालू लागल्या आहेत. आतापर्यंत साधारणतः 12 विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण, योग्य तो फायदा होऊ शकला नाही. त्यामुळे, गेले अनेक वर्ष ही महिला घरी अंथरूळात थिळून होती. मात्र मीरारोडच्या वोक्हार्ट रूग्णालयात या महिलेवर (Constrained Revision Total Hip Replacement) ‘कांस्ट्रेन्ड रिवाइज टोटल हिप रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. शिवाय, या प्रकारची शस्त्रक्रिया उत्तर मुंबईमध्ये पहिल्यांदाच करण्यात आली असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.

57 वर्षीय लिंडा कोटक असं या महिलेचे नाव आहे. या महिलेला हिपच्या एव्हस्क्युलर नेक्रोसिस (एव्हीएन) ची लक्षणे होती. यामुळे तरूण वयातच या महिलेचा खोबा निकामी झाला होता. चालताना, उठायला आणि बसायलाही त्रास जाणवत होता. चालणे-फिरणे बंद होऊन दैनंदिन कामे करणेही अवघड झाले होते.

12 विविध शस्त्रक्रियांनंतर उभ्या राहिल्या -

वयाच्या 30 व्या वर्षी म्हणजेच 1995 मध्ये त्यांच्या डाव्या खोब्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही.1996 मध्येही शस्त्रक्रिया करून इम्पॉंट बसवण्यात आले होते. 2005 मध्येही शस्त्रक्रिया झाली. कोटक यांना कोणाच्याही आधाराविना चालता येत नव्हते. चालताना त्यांना काठी किंवा वॉकरचा आधार घ्यावा लागत होता. याशिवाय घरी वावरताना ही त्या पडायच्या. यामुळे, त्यांच्या उजव्या घोट्याला फ्रॅक्चर आणि डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. चालता येत नसल्याने त्यांच्या मणका आणि गुडघ्यावरही खूप ताण आला होता. यासाठीही त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याशिवाय 2019 मध्ये स्पाईन सर्जन सुद्धा करण्यात आली. 2012 मध्ये दोन्ही गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

फेब्रुवारी 2020 मध्ये या महिलेला सांधे दुखीचा त्रास जाणवू लागला. कुटुंबियांनी त्यांना पाच वेळा स्थानिक रूग्णालयात दाखल केले. परंतु, त्यानंतर या महिलेच्या कुटुंबियांनी त्यांना मीरा रोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी कांस्ट्रेन्ड रिवाइज टोटल हिप रिप्लेसमेंट (टीएचआर) हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. त्यानुसार कुटुंबियांची परवानगी घेऊन 16 जून रोजी या महिलेवर हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे ही महिला पुन्हा चालू फिरु शकते.

कांस्ट्रेन्ड रिवाइज टोटल हिप प्रत्यारोपण ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. या महिलेला अनेक वर्षांपासूनच दुखणं होतं. अनेक शस्त्रक्रिया झाल्या पण काही फरक पडला नाही. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणं आमच्यासाठी एक आव्हान होतं. अस्थिर हिपवर शस्त्रक्रिया करणे हे खूप दुर्मिळ आहे. साधारणतः पाच दिवस अतिदक्षता विभागात या महिलेवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. आता ही महिला पुन्हा चालू-फिरू शकतेय. - डॉ. गिरीश भालेराव, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक आणि जॉईंन रिप्लेसमेंट तज्ज्ञ अँण्ड स्पाइन सर्जन , वोक्हार्ट रूग्णालय

woman walked after 25 long years after constrained revision total hip replacement surgery

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com