मुंबई

‘ती’च्या प्रेमकबुलीमुळे तरुणाला दिलासा

सकाळवृत्तसेवा

मुंबई - अल्पवयीन मुलीशी प्रेमविवाह केल्यामुळे तुरुंगवारी कराव्या लागलेल्या २० वर्षीय तरुणाला मुलीने दिलेल्या प्रेमाच्या कबुलीमुळे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अल्पवयीन मुलीबरोबर विवाह केला असला, तरी संबंधित मुलीचेही त्याच्यावर प्रेम असल्याचे तिच्या जबाबातून स्पष्ट हाते, असे निरीक्षण नोंदवून आरोपी तरुणाची शिक्षा स्थगित करत मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

पुणे जिल्ह्यात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने पॉस्को कायद्यांतर्गत सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आरोपी शर्मन सेरे (नाव बदलले आहे) याचे एका १५ वर्षांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. 

मुलीच्या घरी जाऊन त्याने तिच्यासोबत लग्न लावून देण्यासाठी मागणीही घातली होती; मात्र मुलीच्या आजीने लग्नाला नकार दिला होता, त्यामुळे ते दोघेही स्वेच्छेने घरातून पळून गेले. 

याबाबत मुलीच्या घरच्यांनी पोलिस फिर्याद नोंदवली होती. वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतानाच पोलिसांना त्यांची माहिती मिळाल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. 

सेरेच्या विरोधात पॉस्को कायद्यांतर्गत ३६३, ३६६, ३७६ आदी अल्पवयीन मुलीची फसवणूक, बलात्कार आदी गुन्हे नोंदवण्यात आले होते. यामध्ये त्याला विशेष न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. 

या शिक्षेविरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्या. ए. एम. बदर यांच्यापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. पीडित मुलीने तिचे आरोपी मुलावर प्रेम होते आणि स्वेच्छेने त्याच्याबरोबर ती गेली होती असे जबाबात सांगितल्याने न्यायालयाने आरोपी तरुणाची शिक्षा स्थगित केली.

रोजगार आणि भविष्याचा विचार
उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या एका निकालामध्ये अल्पवयीन मुलीचे जर एखाद्या मुलाशी प्रेमसंबंध असतील आणि पालकांच्या संमतीशिवाय जर ते एकमेकांबरोबर राहत असतील तर त्या वेळेस आरोपीची शिक्षा निलंबित करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचा दाखला यामध्ये देण्यात आला आहे. त्यानुसार जर मुलीचे प्रेम असेल तर त्याचा विचार करून आणि मुलाच्या रोजगार आणि भविष्याचा विचार करून त्याची शिक्षा सशर्त निलंबित करण्याचा दाखला देण्यात आला आहे. यानुसार न्यायालयाने सेरेची शिक्षा निलंबित केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : निसर्गाचा अप्रतिम नजारा पाहायचाय? मग, महाराष्ट्राच्या 'या' माऊंट एव्हरेस्टला नक्की द्या भेट

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT