Devendra Fadnavis  esakal
मुंबई

Shiv Sena Case: शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब! फडणविसांनी केलं SCच्या निकालाचं विश्लेषण

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टानं आज निकाल दिला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टानं निकाल जाहीर केला. यातील सर्व महत्वाच्या मुद्दांचं विश्लेषण उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं. फडणवीस काय म्हणालेत वाचा सविस्तर

फडणवीस म्हणाले, "सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर आम्ही पूर्ण समाधान व्यक्त करतो. लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपण विजय झाला आहे. हा जो काही निकाल आहे त्यातील चार पाच जे महत्वाचे मुद्दे आहेत. त्यांपैकी पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पूर्णपणे पाणी फेरलं आहे. कारण उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही.

दुसरं त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं आहे की, अपात्रतेचा सर्व अधिकार अध्यक्षांचा आहे. अध्यक्षच त्यावर निर्णय घेतील. सुप्रीम कोर्टात यात हस्तक्षेपास नकार दिला आहे. ज्या आमदारांविरोधात खटला दाखल आहे त्यांना सध्या पूर्ण अधिकार आहेत, असंही कोर्टानं म्हटलं आहे. तसेच जे काही सभागृहाचं कामकाज चालेल त्यामध्ये अपात्रेचा काहीही परिणाम होणार नाही. तसेच निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार आहेत हे देखील कोर्टानं म्हटलं आहे. आयोग स्वतंत्रपणे यावर निर्णय घेऊ शकतो. त्यामुळं आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाकडून जे दावे करण्यात आले होते ते पूर्णपणे चुकीचं असल्याचं सिद्ध झालं आहे.

तसेच दहाव्या सुचीनुसार राजकीय पक्ष कुठला? हे ठरवण्याचे अधिकार देखील विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहेत. त्यामुळं याही बाबतीत स्पष्टपणे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले आहेत. त्यामुळं हे सरकार पूर्णपणे संविधानिक बनलं आहे, अशा निकालातील विविध मुद्द्यांचं विश्लेषण फडणवीसांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT